उलवेतून दुचाकीचोरास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 00:55 IST2019-03-09T00:55:36+5:302019-03-09T00:55:42+5:30
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उलवेतून सराईत वाहनचोराला अटक केली आहे.

उलवेतून दुचाकीचोरास अटक
नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उलवेतून सराईत वाहनचोराला अटक केली आहे. चौकशीत त्याच्याकडून चोरीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत. वाढते वाहनचोरीचे गुन्हे नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेकडून सराईत वाहनचोरांचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान एका सराईत वाहनचोराची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांनी सहायक निरीक्षक नीलेश माने, विजय चव्हाण, उपनिरीक्षक योगेश वाघमारे, सहायक उपनिरीक्षक शेखर तायडे, मनोहर चव्हाण, हवालदार अनिल कदम, सतीश भोसले आदींचे पथक तयार केले होते. त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार उलवे परिसरात पाळत ठेवली होती. या वेळी दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या नदीम युसूफ शेख याला अटक केली. तो उलवे सेक्टर ३६ चा राहणार आहे. चौकशीत त्याने ११ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नेरुळमधील ९, वाशीतील १ व मुंबईची १ दुचाकी आहे.