ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 02:49 IST2018-09-22T02:49:00+5:302018-09-22T02:49:03+5:30

ट्रेलरच्या धडकेने दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना एपीएमसी येथील माथाडी भवन चौकात घडली आहे.

Two-wheeler death in the trailer's footsteps | ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नवी मुंबई : ट्रेलरच्या धडकेने दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना एपीएमसी येथील माथाडी भवन चौकात घडली आहे. अपघातानंतर ट्रेलर चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढला. याप्रकरणी चालकाविरोधात एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमिर खान (२९) असे अपघातामध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मोटारसायकलवरून जात असताना माथाडी भवन चौकात ट्रेलरने त्याला धडक दिली. माथाडी चौकातून तुर्भे स्थानकाकडे येणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला. यामध्ये ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारवाईच्या भीतीने ट्रेलर चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढला. यामुळे सदर मार्गावर काही वेळासाठी वाहतूककोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी ट्रेलर मार्गातून हटवल्यानंतर सदर मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत झाला.
या अपघातप्रकरणी ट्रेलरच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय निकम यांनी सांगितले. तसेच अपघात नेमका घडला कसा याचाही तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Two-wheeler death in the trailer's footsteps