CoronaVirus News: नवी मुंबईत कोरोनाचा स्फोट! वृद्धाश्रमातील ६१ पैकी ५६ जणांना लागण; २ वृद्धांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:17 PM2021-04-20T16:17:43+5:302021-04-20T16:18:59+5:30

Two senior citizens succumb 50 others test positive for COVID 19 at Old Age Home in navi mumbai: १४ वृद्धांची प्रकृती गंभीर; एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू

Two senior citizens succumb 50 others test positive for COVID 19 at Old Age Home in navi mumbai | CoronaVirus News: नवी मुंबईत कोरोनाचा स्फोट! वृद्धाश्रमातील ६१ पैकी ५६ जणांना लागण; २ वृद्धांचा मृत्यू

CoronaVirus News: नवी मुंबईत कोरोनाचा स्फोट! वृद्धाश्रमातील ६१ पैकी ५६ जणांना लागण; २ वृद्धांचा मृत्यू

Next

नवी मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'ब्रेक द चेन' अभियानाच्या अंतर्गत १५ दिवसांची संचारबंदी लागू केल्यानंतरही राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली नाही. राज्यात दररोज कोरोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. राज्यातील अनेक रुग्णालयांमधील रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीपेक्षा आताचं कोरोना संकट गंभीर आहे. त्यामुळे कुटुंबाच्या कुटुंब कोरोनाबाधित असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आता कोरोना अधिक संक्रामक झाला आहे. त्यामुळे बाधिताच्या संपर्कात आलेल्या ७० ते ८० टक्के लोकांना कोरोनाची लागण होत आहे. नवी मुंबईतील तळोजा येथे असलेल्या एका वृद्धाश्रमातल्या ६१ पैकी ५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १४ जणांची प्रकृती गंभीर आहे. तर २ वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शेवटी आईच ती! ६ महिन्यांपूर्वी निधन झालेल्या मुलाला आई व्हिडीओ कॉल करते अन् लेक बोलतो...

प्रकृती नाजूक असलेल्या १४ वृद्धांवर सध्या कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना वृद्धाश्रमामध्येच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. वृद्धाश्रमातल्या दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर रविवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला. त्यातून ५६ जणांना कोरोना झाल्याची माहिती समजली. प्रकृती गंभीर असलेल्या १४ जणांना कामोठे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या ते ऑत्सिजन सपोर्टवर आहेत.

Web Title: Two senior citizens succumb 50 others test positive for COVID 19 at Old Age Home in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.