तलवारीसह दोन गुप्ती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 01:24 IST2019-04-05T01:24:29+5:302019-04-05T01:24:46+5:30

एकास अटक : पनवेल शहर पोलिसांची कारवाई

Two seizure seized with swords | तलवारीसह दोन गुप्ती जप्त

तलवारीसह दोन गुप्ती जप्त

पनवेल : शहर पोलिसांनी आरोपीकडून तलवार व दोन गुप्ती हस्तगत केल्या आहेत. मनोहरसिंह गोवर्धनसिंह राजपुरोहित (४३) असे आरोपीचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील जोशी आळी परिसरात एक व्यक्ती तलवारीसह दोन गुप्ती घेऊन येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यांच्या पथकाने शुभ लाभ बिल्डिंगमध्ये छापा टाकून आरोपी मनोहरसिंह गोवर्धनसिंह राजपुरोहित याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याआधी तळोजा, पनवेल परिसरातून अशाच प्रकारे शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोम्बिग आॅपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्यांतर्गत संबंधित प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.
 

Web Title: Two seizure seized with swords