घणसोलीत गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 21:47 IST2019-10-28T21:46:51+5:302019-10-28T21:47:54+5:30
घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोटात झाल्यामुळे घडलेल्या दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

घणसोलीत गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन जण गंभीर जखमी
नवी मुंबई - घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोटात झाल्यामुळे घडलेल्या दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ऐन दिवाळीत घणसोली गावातील गावदेवी वाडी परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
श्याम बहादूर सिंग वय ३७, उमेश तिवारी वय ४५ अशी जखमींची नावे असून त्यापैकी उमेश तिवारी यांची प्रकृती चिंताजनक असून ते ९० टक्के भाजलेले असल्याचे सांगण्यात येते. जखमींना ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात हि दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे कि, घणसोली गावात गावदेवी वाडीत श्री गणेश अपार्टमेट कदम वाडी येथे पहिल्या माळ्यावर सत्यप्रकाश तिवारी राहतात. त्यांच्याच घरातील सिलींडरचा स्फोट झाल्याने त्याची झळ शेजारी राहत असलेल्या श्यामंबहादूर सिंग यांच्या घरापर्यंत गेल्यामुळे त्यात दोघे जण भाजले. जखमींना त्वरित रुग्णालयात पोचविण्याचे मदतकार्य येथील रहिवासी जीवन गायकर आणि राहुल सूर्यवंशी यांनी केले. त्यांना या स्फोटाचा आवाज प्रचंड तीव्र स्वरुपात असल्यामुळे आजूबाजूच्या इमारतीमधील अनेक लोक जीव मुठीत धरून पळत होते सिलिंडरमधून गॅस गळती झाल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.