शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

दोन लाख २५ हजार अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 5:05 AM

सिडकोच्या १४८३८ घरांसाठी तब्बल दोन लाख २५ हजार अर्ज दाखल झाले आहेत.

नवी मुंबई : सिडकोच्या १४८३८ घरांसाठी तब्बल दोन लाख २५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी एक लाख ७१ हजार अर्जदारांनी शुल्काचा भरणा केला आहे, तर उर्वरितांना शुल्क भरण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. २ आक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.सिडकोच्या माध्यमातून घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न गटासाठी १४८३८ घरांचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. १६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. या कालावधीत तब्बल दोन लाख २५ हजार ग्राहकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी सुमारे पावणेदोन लाख अर्जदारांनी शुल्काचा भरणा करून प्रक्रिया पूर्ण केली आहे. शुल्क भरण्यासाठी सोमवारी संध्याकाळपर्यंतची वेळ असल्याने प्रत्यक्ष अर्जदारांचा आकडा दोन लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज सिडकोच्या संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सिडकोने पुढील वर्षभरात विविध घटकांसाठी ५५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी २५ हजार घरांची घोषणा डिसेंबरमध्ये केली जाणार आहे. उर्वरित ४० हजार घरांचा आराखडाही तयार केला आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई