दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक

By Admin | Updated: October 8, 2015 00:52 IST2015-10-08T00:52:25+5:302015-10-08T00:52:25+5:30

उल्हासनगर येथील प्रोजेक्टमध्ये घरे खरेदीसाठी पैसे घेवून घर न देता फसवणूक करणाऱ्या मोनार्च सॉलीसेटर कंपनीच्या दोघा संचालकांना अटक झाली आहे. त्यांच्याविरोधात

Two builders arrested | दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक

दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक

नवी मुंबई : उल्हासनगर येथील प्रोजेक्टमध्ये घरे खरेदीसाठी पैसे घेवून घर न देता फसवणूक करणाऱ्या मोनार्च सॉलीसेटर कंपनीच्या दोघा संचालकांना अटक झाली आहे. त्यांच्याविरोधात मे महिन्यात गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार मंगळवारी मीरा रोड येथून दोघांना अटक करण्यात आली.
कळंबोली येथे राहणाऱ्या नागेंद्रप्रताप सिंग यांची मोनार्च सॉलीसेटर कंपनीने फसवणूक केली होती. सिंग यांनी मोनार्च कंपनीच्या उल्हासनगर येथे सुरु असलेल्या प्रोजेक्टची माहिती घेतली. यावेळी कंपनीचे संचालक हसमुख ठाकूर, गोपाळ ठाकूर, रोशन व अशोक यांनी सिंग यांची भेट घेतली. त्यांनी सदर प्रोजेक्ट दीड वर्षात पूर्ण होणार असल्याचे सांगून नफ्याचे आमिष दाखवून दोन घरांचे बुकिंग करायला सांगितले. यानुसार सिंग यांनी पाच महिन्यात त्यांना ६६ लाख रुपये अ‍ॅडवान्स दिले होते. परंतु नियोजित कालावधी पूर्ण होवूनही त्यांना घर मिळाले नाही. त्यामुळे सिंग यांनी झालेल्या फसवणूक प्रकरणी मोनार्च बिल्डर्सच्या विरोधात गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे तक्रार केली होती. परंतु गुन्हा दाखल होण्यापूर्वी कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून सर्व संचालक भूमिगत झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या शोधात होते. मंगळवारी हसमुख व गोपाळ ठाकूर हे दोघे मीरारोड येथील एका हॉटेलमध्ये लपले असताना त्यांना अटक केल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर तक्रारदार सिंग यांनी न्यायालयापुढे प्रतिज्ञापत्र सादर करून तक्रार मागे घेतली. त्यामुळे दोघांचीही सुटका करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two builders arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.