शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्गावर दोन अपघात, सानपाड्यामध्ये डम्पर पलटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:45 IST

सायन-पनवेल महामार्गावर सानपाडामध्ये गुरुवारी सकाळी ६ वाजता डम्पर उलटून दोघे जण जखमी झाले. कोपरा पुलाजवळही पहाटे ४ वाजता ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला.

नवी मुंबई, पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडामध्ये गुरुवारी सकाळी ६ वाजता डम्पर उलटून दोघे जण जखमी झाले. कोपरा पुलाजवळही पहाटे ४ वाजता ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला. यामुळे दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.महामार्गावर धीम्या गतीने सुरू असलेले काँक्रीटीकरणाचे काम तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सूचना फलक नसल्यामुळे वाहतुकीच्या समस्येमध्ये वाढ होते आहे. वाशी ते कळंबोली दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात परावर्तक पट्ट्या लावण्यात आलेल्या नाहीत, यामुळे वारंवार अपघात होत आहेत. पुण्याच्या दिशेने जाणारा डम्पर पहाटे सानपाडा पुलावरून जात होता. मात्र, काँक्रीटीकरणासाठी खोदलेला रस्ता चालकाच्या लक्षात न आल्याने डम्पर खड्ड्यात उलटला. यामध्ये चालक आणि वाहक दोघे जखमी झाले. सीआरपीएफचे जवान पनवेलकडे जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. जखमी चालक व वाहकाला त्यांनी तात्काळ त्यांच्या गाडीतून महापालिकेच्या रुग्णालयात नेऊन भरती केले. पोलिसांनी के्रनच्या साहाय्याने डम्पर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.कोपरा पुलाजवळही पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. या अपघातामध्ये चालक जखमी झाला आहे. येथेही काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. पुलावर बॅरिकेड्स ठेवण्यात आले आहेत. येथे वाहतुकीमध्ये केलेल्या बदलाचा चालकाला अंदाज येत नाही. काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सूचना देण्यात आल्या नसल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांनीही ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे.सीआरपीएफच्या जवानांचे कौतुक : सानपाडामध्ये पहाटे अपघात झाल्यानंतर महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनीही गर्दी करण्यास सुरुवात केली होती. येथून जाणाºया सीआरपीएफ च्या जवानांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तत्काळ जखमी चालक व वाहकाला त्यांच्या कारमधून महापालिका रुग्णालयात नेऊन भरती केले. जवान दिनेश वाघ व त्यांच्या सहकाºयांचे नागरिकांनीही कौतुक केले.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई