माहिती देणारा एलईडी स्क्रीन बंद
By Admin | Updated: February 15, 2016 03:03 IST2016-02-15T03:03:05+5:302016-02-15T03:03:05+5:30
सरकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी तसेच सरकारी दाखले काढण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून ही माहिती सार्वाजनिक करण्याच्या दृष्टीने प

माहिती देणारा एलईडी स्क्रीन बंद
वैभव गायकर, पनवेल
सरकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी तसेच सरकारी दाखले काढण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून ही माहिती सार्वाजनिक करण्याच्या दृष्टीने पनवेल तहसील कार्यलयाच्या वतीने कार्यालयाबाहेर एलईडी स्क्र ोलिंग डिस्प्ले बसविण्यात आला. मात्र काही दिवसांच्या कालावधीनंतरच हा स्क्रीन बंद पडल्याने हा केवळ फार्स असल्याचे बोलले जात आहे.
समाजातील विविध मागास प्रवर्गातील जनता आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना अमलात आणल्या जातात. अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा सरकारकडून होतात. मात्र लाभार्थ्यांना याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. दलाल याचा गैरफायदा घेऊन पैसे उकळण्याचे काम करीत असतात. विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती नागरिकांना मिळत नाही. दाखले सरकारी कार्यालयांमधून कसे मिळवायचे, मतदार नोंदणी कशी करायची, स्पर्धा परीक्षा तसेच महसूल विभागात चालणारे कामकाज याची माहिती सर्वसामान्यांना नसते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असतात. अनेकदा सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागतात. यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक अभिनव संकल्पना समोर आणली होती. ही संकल्पना जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांत राबवली गेली. प्रत्येक तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागावर मोठ्या आकाराचा एलईडी टीव्ही लावण्यात आला. या टीव्हीमध्ये सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी होणारे चावडी वाचन, फेरफार अदालत तसेच ई-अभिलेख, समाजकल्याण विभागाच्या संजय गांधी योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ योजना अशा विविध योजनांसाठी कोण पात्र आहे अथवा त्याच्या पात्रतेसंदर्भात माहिती, त्यांचा लाभ कसा घेत येईल तसेच पुरवठा विभागाच्या योजना या डिस्प्लेद्वारे नागरिकांना वाचायला मिळत होत्या.
सरकारने जाहीर केलेल्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना नसते. दलाल याचाच गैरफायदा घेत असतात. योजनाबद्दल माहिती देऊन आमच्यामार्फत हे काम करून घेतल्यास तुमची कामे लवकर होतील, अशी बतावणी करून सर्वसामान्यांना लुबडण्याचे प्रकार होऊशकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. यासंदर्भात पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांना विचारणा केली असता लवकरात लवकर हे एलईडी स्क्र ोलिंग डिस्प्ले सुरू करण्यात येईल असे सांगितले.