शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईची हवा काळवंडली! तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग; धुराच्या लोटांमुळे परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:30 IST

Turbhe Dumping Ground Fire: नवी मुंबईतील तुर्भे येथील डंपिंग ग्राउंडला शुक्रवारी सकाळी मोठी आग लागली. वाशी, नेरुळ आणि एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. वाचा सविस्तर.

नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील डंपिंग ग्राउंडला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीचे स्वरूप इतके मोठे आहे की, डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे अजस्त्र ढिग जळून खाक झाले असून संपूर्ण परिसरात काळपट आणि दाट धुराचे लोट पसरले आहेत. या धुरामुळे लगतच्या वसाहतींमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

आग लागल्याची वर्दी मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेतली. आगीची तीव्रता पाहता वाशी, नेरुळ, कोपरखैराणे, ऐरोली, बेलापूर यासह एमआयडीसी विभागाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आग धुमसत असल्याने ती विझवण्यासाठी जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रदूषणाचा धोका वाढलासुदैवाने या भीषण आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, डंपिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या आगींमुळे तुर्भे आणि वाशी परिसरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. "नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Massive Fire Engulfs Turbhe Dumping Ground, Navi Mumbai; Air Quality Worsens

Web Summary : A major fire broke out at the Turbhe dumping ground in Navi Mumbai, blanketing the area in thick smoke. Firefighters are battling the blaze, which poses a significant pollution risk. No casualties have been reported, but air quality has deteriorated, prompting calls for calm.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआगGarbage Disposal Issueकचरा प्रश्नdumpingकचरा