शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आदिवासी विद्यार्थी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:45 AM

आदिवासी समाजाच्या वन हक्क मान्यता कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. आमचा आदिवासींचा इतिहास लिहिला गेला नाही, कारण आमच्या समाजात सुशिक्षित माणसेच नव्हती, परंतु आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही

- जयंत धुळपअलिबाग : आदिवासी समाजाच्या वन हक्क मान्यता कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. आमचा आदिवासींचा इतिहास लिहिला गेला नाही, कारण आमच्या समाजात सुशिक्षित माणसेच नव्हती, परंतु आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही, अशी प्रखर प्रतिक्रि या आदिवासी युवकांनी मंगळवारी पेण येथे व्यक्त केली.सर्व शिक्षित आदिवासी युवक व युवती हुतात्मा नाग्या कातकरीच्या ८८ व्या स्मृतिदिनानिमित्त पेण येथे अंकुर ट्रस्ट व लोकमंच संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्र मात बोलत होते. या वेळी पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांना लेखी निवेदनही दिले. तत्पूर्वी रायगड बाजार पेण येथून आपल्या पारंपरिक वाद्यवृंदासह आदिवासींनी वाजतगाजत भव्य मिरवणूक काढून लहान आदिवासी बालकांनी केलेल्या आदिम जमातीच्या वेशभूषेने पेणकरांचे लक्ष वेधले.स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन गेल्या २० वर्षांपासून रायगड जिल्ह्यात पाळण्यात येतो. आदिवासींच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण येथील आदिवासींनी प्रखर लढा देऊन आपल्या हुतात्मा नाग्या महादू कातकरीचे नाव चिरनेरच्या मूळ स्तंभावर कोरले होते. तेव्हापासून हुतात्मा नाग्याची चळवळ आदिवासींच्या अस्मितेची चळवळ म्हणून ओळखली जाते. या दिवशी ठिकठिकाणी कातकरी आदिवासी एकत्र येऊन आपल्या उपजीविकेच्या हक्कांबद्दल मांडणी करत असतात.कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील आदिवासींची अन्नसुरक्षा राखण्यासाठी वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी गरजेची आहे, तसेच रेशनवरील धान्याच्या ऐवजी रोख रक्कम टाकण्याचा शासनाचा निर्णय कसा विसंगत आहे हे आदिवासी भाषेतील भाषणात प्रभावीपणे मांडले.तहसीलदार पाटणे यांनी वनमित्र अभियानाची सविस्तर माहिती देऊन याबाबतच्या अडचणींचे निवारण प्रभावीपणे करण्याचे आश्वासन सभेत दिले. या प्रसंगी आदिवासी सरपंच नीरा मधे, भारती पवार, गौरी कसबे, हर्षली ढेबे, विनोद वाघमारे यांनी आपले विचार मांडले. या वेळी आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रतिनिधी अजित पवार, पुरवठा अधिकारी हरी हडके यांनी योजनांची सविस्तर माहिती देऊन अडचणी समजावून घेतल्या. अंकुर संस्थेच्या झेप आदिवासी आश्रमातील मुलांनी कातकरी भाषेतील गाणी व नृत्ये सगळ्यांची वाहवा मिळवून गेली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीnewsबातम्या