शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना मिळाल्या वनजमिनी

By admin | Updated: January 9, 2016 02:20 IST

गेल्या अनेक वर्षांपासून जे आदिवासी बांधव वनजमिनी कसत होते, त्या जमिनीचा सातबारा आता त्यांच्या नावावर करण्यात आला आहे.

पनवेल : गेल्या अनेक वर्षांपासून जे आदिवासी बांधव वनजमिनी कसत होते, त्या जमिनीचा सातबारा आता त्यांच्या नावावर करण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील ५८० जणांना ३६ भूखंडांची सनद गुरुवारी पनवेल तहसील कार्यालयात वाटण्यात आली. त्यामुळे आता ही जमीन आदिवासींच्या मालकीची झाली आहे. त्यावरील अतिक्र मणाचा शिक्का पुसण्यात आला आहे.पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या आणि पाडे आहेत. अतिशय दुर्गम भागात राहून वनवासी कसाबसा उदरनिर्वाह करतात. कित्येकांनी हक्काची जागा नसल्याने ते वन जमीन कसत आहेत. त्या जमिनीत मशागत करून भाज्या पिकवल्या जात आहेत. काहींनी याच जमिनीवर राहण्याकरिता निवारा बांधला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जमिनी हे कुटुंब कसत असतानाही वनविभागाकडून या जमिनी वर्ग करण्यात आल्या नव्हत्या. जमिनीच्या रेकॉर्डवर अतिक्र मणाचा शिक्का पडला असल्याने आदिवासींना शासकीय योजनेत भाग घेता येत नव्हता. त्याचबरोबर त्यांना लाभही मिळत नसल्याने हे कुटुंब उपेक्षित होते. या वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. तहसीलदार दीपक आकडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण कदम, तलाठी संदीप भंडारे, विशाल भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले. गेल्या सहा महिन्यापासून पुरावे जमा करण्याचे काम सुरू होते. हे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले. त्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी हिरवा कंदील दिला. त्याचबरोबर सर्व कागदपत्रे तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करून गुरुवारी आदिवासींना तहसीलदार दीपक आकडे यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार बी.टी. गोसावी, कल्याण कदम, उमेश पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. त्यामुळे आता या जमिनीवर आदिवासींचा कायद्याने हक्क लागू झाला आहे. त्यांना वन आणि इतर विभागाकडून त्रास होणार नाही. (वार्ताहर)