शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

स्लीपर तुटल्याने ट्रान्स हार्बर विस्कळीत, ट्रेनमधून उतरून प्रवाशांनी गाठले स्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:43 AM

रेल्वे रुळांना जोडणारी स्लीपर तुटल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

नवी मुंबई : रेल्वे रुळांना जोडणारी स्लीपर तुटल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. अनेकांनी रखडलेल्या ट्रेनमधून उतरून स्थानक गाठले. तासाभरानंतर ठाणे-वाशी वाहतूक पूर्ववत झाली.रबाळे ते ऐरोली स्थानकांदरम्यान सोमवारी संध्याकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन रुळांना जोडणाºया स्लीपरचा काही भाग तुटलेला असल्याचे ठाण्याच्या दिशेने जाणाºया लोकलच्या मोटरमनच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी रेल्वे थांबवून सदर प्रकाराची माहिती तांत्रिक दुरुस्ती विभागाला दिली. त्यानुसार रेल्वेच्या कामगारांनी त्या ठिकाणी जाऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. ही बाब वेळीच निदर्शनास आल्यामुळे रेल्वेची संभाव्य दुर्घटना टळली.या दुरुस्ती कामादरम्यान ठाण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. परिणामी, ऐन संध्याकाळी गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली, काही महिलांनी तर थांबलेल्या ट्रेनमधून उतरून स्थानक गाठले. अखेर दुरुस्तीचे काम संपल्यानंतर सुमारे एक तासानंतर पावणेसात वाजताच्या दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल