सायन-पनवेल महामार्गावर कोंडी, वाशी टोलनाक्यावर चक्काजाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 00:21 IST2020-08-18T00:21:26+5:302020-08-18T00:21:50+5:30

अर्धा तास टोल नाक्याजवळ चक्काजाम झाला होता. वाशी प्लाझापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

traffic on Sion-Panvel Highway, Chakkajam at Vashi Toll Naka | सायन-पनवेल महामार्गावर कोंडी, वाशी टोलनाक्यावर चक्काजाम

सायन-पनवेल महामार्गावर कोंडी, वाशी टोलनाक्यावर चक्काजाम

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी टॅक्सी व कारचा अपघात झाला. यानंतर, कारचालकाने टॅक्सीची चावी खेचून तेथून पळ काढला. यामुळे अर्धा तास टोल नाक्याजवळ चक्काजाम झाला होता. वाशी प्लाझापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
नवी मुंबई, पनवेलवरून रोज हजारो नागरिक मोटारसायकल व कारनेच मुंबईत कामाच्या ठिकाणी जात आहेत. यामुळे सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत वर्दळ जास्त असते. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टॅक्सी व कारचा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने टॅक्सीची चावी खेचून तेथून पळ काढला. यामुळे टॅक्सी रोडमध्येच उभी ठेवावी लागली. परिणामी, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूककोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन क्रेन मागविली. क्रेनच्या साहाय्याने टॅक्सी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. चावी पळवून नेणाºया चालकाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
>महामार्गावर टोल नाक्याजवळ दोन वाहनांचा अपघात झाला होता. एक चालकाने चावी पळवून नेल्यामुळे टॅक्सी काही वेळ रोडवरच उभी होती. यामुळे वाहतूककोंडी झाली होती. क्रेनच्या साहाय्याने टॅक्सी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
- भानुदास खटावकर, पोलीस निरीक्षक, वाशी वाहतूक शाखा

Web Title: traffic on Sion-Panvel Highway, Chakkajam at Vashi Toll Naka