शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 11:34 PM

ओएनजीसी गेटजवळ नाला तुंबला : रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष; वाहनचालक त्रस्त

अरुणकुमार मेहत्रेलोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : ओएनजीसी गेटजवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेला नाला तुंबल्याने सांडपाणी महामार्गावर वाहत आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला असून परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. पनवेल शहरात येणाऱ्या मार्गिकेवर रस्त्याचे काम चालू आहे. तर दुसºया लेनवर पाणी वाहत असल्याने वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे. वारंवार होत असलेल्या त्रासामुळे चालकाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.पनवेल शहरासह इतर भागात पावसाळीपूर्व नाले सफाईचे कामे सुरु आहेत. परंतू रस्ते विकास महामंळाकडून कामाला सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. महामार्गालगतचे नाले कचरा आणि मातीने भरल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे.पनवेल येथील ओएनजीसी गेटजवळ महामार्गाच्या एका लेनचे काम चालू आहे. त्यामुळे पनवेल शहराकडे येणारी वाहतूक दुसºया लेनवरुन वळवण्यात आली आहे. त्यात महामार्गालगत असलेला नाला तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे. वाहत्या पाण्यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. तसेच वाहतूक कोंडी सुध्दा होत आहे.पाण्यातून ये-जा करणाºया दुचाकी घसरत असल्याने छोटे - मोठे अपघात घडत आहेत. सकाळ- संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याने अर्धा तास याच कोंडीत जात आहे. दररोज वाहतूक ठप्प होत असल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्यातचा संताप वाहनचालक विनोद पवार यांनी व्यक्त केला.

महामार्गालगत पावसाळी नाल्याचा अभावकळंबोली सर्कल ते पळस्पे फाटापर्यंत महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. पण रस्त्यालगत असलेले पावसाळी नाले बुजले आहेत. तर काही ठिकाणी नालेच नाहीत. ओएनजीसीजवळील रेल्वे पुलाखाली नाला तुंबला आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहते. याबाबत रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.