शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 2:43 AM

पर्यटनाच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

वैभव गायकर पनवेल : पर्यटनाच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. मुंबई, नवी मुंबईमधील पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात आपली सुट्टी घालवण्याची संधी मिळाल्याने पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होताना दिसत आहेत. रविवारी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली.कर्नाळा अभयारण्य नैसर्गिक विविधतेने नटलेले ठिकाण आहे. विदेशी जातीचे पक्षी, वन्यजीव, तसेच मोठ्या संख्येने धबधब्यांचा या ठिकाणी समावेश आहे. विशेष म्हणजे, सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पर्यटन ठिकाणे पावसाळ्यात बंद ठेवली जात असल्याने पर्यटक कर्नाळा अभयारण्यात मोठ्या संख्येने येत असतात. आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी कर्नाळा अभयारण्याला भेट दिली आहे. ही संख्या २५ हजारांपेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पर्यटकांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.>पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी १३ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश फीदेखील आकारण्यात येत असल्याने वनविभागालाही या ठिकाणाहून चांगला नफा प्राप्त होत आहे. रविवारी या ठिकाणी १२००पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली.>वर्षासहलीसाठी उरणमध्येही गर्दीउरण : पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. परिसरात असणारे धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना पावसाळ्यात पसंती दिली जाते. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जिल्हाधिकाºयांनी बंदी घातली आहे. त्यामुळे वर्षासहलीसाठी आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि लगतच्या भागातील पर्यटकांनी उरण परिसरातील आक्कादेवी, पुनाडे, रानसईसह पिरवाडी बीचकडे मोर्चा वळविला आहे.>गाढेश्वरची गर्दी माची करंबेळीकडेशनिवारी व रविवारी तालुका पोलिसांनी गाढेश्वर परिसरातील वाजे फाट्यावर बंदोबस्त ठेवला असल्याने पर्यटकांना येथून परत जावे लागत आहे.पर्यटक मुंबई, कोकण, पेण, उरण येथून गाढेश्वर धरणाकडे ये-जा करत असतात. मात्र पर्यटकांच्या या आनंदावर पोलिसांमुळे विरजण पडते व त्यांना माघारी जावे लागते. त्यामुळे पर्यटकांनी यावर नामी शक्कल लढवत तालुक्यातील धबधबे शोधून काढले आहेत. मोरबे गावाच्या पुढे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या करंबेळी धबधब्याकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.तर शेडुंग फाट्याच्या आतमध्ये वारदोली- ठाकूरवाडीजवळच्या माची धबधब्याला पर्यटक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. तर तालुक्यातील मोरबे धरणावर ओल्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत.