मुरु डला पर्यटकांची गर्दी
By Admin | Updated: May 29, 2017 06:31 IST2017-05-29T06:31:43+5:302017-05-29T06:31:43+5:30
शनिवार व रविवार सलग सुट्यांचा सिझन आल्याने मुंबई, ठाणे तसेच पुणे या भागातून प्रचंड संख्येने पर्यटकांनी मुरुडचा सागरी

मुरु डला पर्यटकांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव/ मुरुड : शनिवार व रविवार सलग सुट्यांचा सिझन आल्याने मुंबई, ठाणे तसेच पुणे या भागातून प्रचंड संख्येने पर्यटकांनी मुरुडचा सागरी किनारा गाठला आहे. स्वत:चे चारचाकी वाहन घेऊन आल्याने शनिवार व रविवारी मुरु ड समुद्रकिनारी वाहनांच्या मोठ्या रांगा निदर्शनास आल्या. त्यामुळे तुरळक प्रमाणात वाहतूककोंडी सुद्धा झाली होती. या दोन दिवसांत शहरातील सर्व लॉज तसेच हॉटेल तुडुंब भरलेले दिसून आले. सकाळपासूनच समुद्र स्नान घेताना अनेक पर्यटक दिसून आले.
मुरु डसह काशिद समुद्रकिनारी मोठी गर्दी दिसून आली. बहुतांशी पर्यटकांनी उंट सफारी, तसेच वाळूवर चालणाऱ्या गाड्या, पॅरॉग्लायडिंग, बनाना बोटीचा आनंद घेताना दिसून आले. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांचा धंदा तेजीत दिसून आला. मुरु ड व काशिदला येण्याअगोदरच राहण्याची बुकिंग केल्यामुळे सर्व पर्यटकांना राहण्याची व्यवस्था झाली होती. थोडक्यात बहुतांशी पर्यटकांनी समुद्रकिनारी भेट दिल्याने कोकणातील सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी तुडुंब भरले होते. या पर्यटनामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळून आर्थिक सुबत्ता प्राप्त होताना दिसून येत आहे. प्रचंड संख्येने पर्यटक आल्याने समुद्र किनारा फु लला होता.
फणसाडमध्ये फिरण्यासाठी गाडीची मागणी
१मुरु ड तालुक्यातील फणसाड अभयारण्य हे ५४ चौरस किलोमीटर अंतरावर पसरले असून येथे अनेक वन्यजीव वास्तव्य करून आहेत.परंतु या अभयारण्यात एप्रिल व मे महिन्यात असंख्य पर्यटक येत असतात, परंतु त्यांना पायी चालून हे अरण्य पहावे लागते.या अभयारण्याचे क्षेत्र खूप मोठे असल्याने चालून चालून पर्यटक खूप वैतागत आहेत.त्यामुळे या अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटकांना खास गाड्यांची व्यवस्था करावी अशी पर्यटकांची मागणी आहे.
२फिरण्यासाठी मिळणाऱ्या गाडीचे अतिरिक्त शुल्क भरावयास तयार असल्याची खात्री सुद्धा पर्यटकांनी दिली आहे. फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांच्याशी संपर्कसाधला असता ते म्हणाले की, फणसाड अभयारण्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. सुमारे ५४ चौरस किलोमीटरचे क्षेत्र असल्याने साहजिकच पर्यटकांची मागणी ही रास्त आहे. परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यवाही झाल्यास ही मागणी मंजूर होणार आहे. पर्यटकांची मागणी लेखी स्वरूपात वरिष्ठ कार्यालयास कळवली जाईल व याचा पाठपुरावा सुद्धा करू. जर का गाडीसाठी ठोस निर्णय घेण्यात आला तर याचा येथील पर्यटकांना मोठा फायदा निश्चित होईल असा विश्वास तडवी यांनी व्यक्त केला आहे.