एक आठवड्यात टोमॅटोचे दर दुप्पट! आवक वाढल्याने गवार, शेवगा, भेंडी तेजीत; वाटाण्यासह पालेभाज्यांचे दर मात्र घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:40 IST2025-12-18T11:39:03+5:302025-12-18T11:40:57+5:30

हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यात टोमॅटोचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीमध्ये बुधवारी १८६ टन टोमॅटोची आवक झाली आहे.

Tomato prices double in a week! Guar, shevga, okra rise due to increased arrivals; however, prices of green vegetables including peas fall | एक आठवड्यात टोमॅटोचे दर दुप्पट! आवक वाढल्याने गवार, शेवगा, भेंडी तेजीत; वाटाण्यासह पालेभाज्यांचे दर मात्र घसरले

एक आठवड्यात टोमॅटोचे दर दुप्पट! आवक वाढल्याने गवार, शेवगा, भेंडी तेजीत; वाटाण्यासह पालेभाज्यांचे दर मात्र घसरले

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक आठवड्यात टोमॅटोचे भाव किलोमागे १६ ते ३४ रुपयांवरून २६ ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ८० रुपयांवर गेले. एक आठवड्यात दर दुप्पट झाले आहेत. शेवगा, भेंडी व गवारचे दरही वाढले आहेत. वाटाणा, कोबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांचे दर मात्र नियंत्रणात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यात टोमॅटोचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीमध्ये बुधवारी १८६ टन टोमॅटोची आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाल्याने दर आठवडाभरात दुप्पट झाले. रोज दरात वाढ होत आहे. किरकोळ मार्केटमध्येही दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीमध्ये ४४६ टन वाटाण्याची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे दर ५० ते ७० रुपये किलोवरून ३० ते ४० रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे.

होलसेल व किरकोळ मार्केटमधील दर

वस्तू          होलसेल          किरकोळ

टोमॅटो       २६ ते ६०          ६० ते ८०
भेंडी          ५२ ते ७०         १०० ते १२०
गवार         ७० ते १००        १४० ते १६०
शेवगा शेंग  १६० ते २००      ३२० ते ४००
वाटाणा      ३० ते ४०          ६० ते ७०
कोबी         १० ते १६          ४० ते ५०
फ्लॉवर       १० ते १४          ४० ते ६०
दुधी भोपळा १६ ते २४        ५० ते ६०

किरकोळ मार्केटमध्ये पालक जुडी ३० रुपये 

भाजीपाल्याच्या दरातही घसरण झाली आहे. किरकोळ मार्केटमध्ये कोथिंबीर जुडी २० रुपये, मेथी २०, पालक व शेपू ३० रुपये जुडी दराने विकली जात आहे. पालेभाज्यांसह अनेक वस्तूंचे दर कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title : एक सप्ताह में टमाटर के दाम दोगुने; अन्य सब्जियों में उतार-चढ़ाव

Web Summary : एक सप्ताह में टमाटर के दाम दोगुने हो गए। ग्वार, भिंडी और सहजन के दाम बढ़े। मटर और पत्तेदार सब्जियों के दाम गिरे, जिससे उपभोक्ताओं को राहत मिली। थोक और खुदरा मूल्यों में काफी अंतर रहा।

Web Title : Tomato Prices Double in a Week; Other Vegetables Fluctuate

Web Summary : Tomato prices doubled in a week. Guwar, okra, and drumstick prices rose. Pea and leafy vegetable prices dropped, offering consumers relief. Wholesale and retail rates varied significantly.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tomatoटोमॅटो