मराठा समाजाचे आज आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:37 IST2020-09-16T00:36:53+5:302020-09-16T00:37:22+5:30

बुधवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

Today agitation of Maratha community | मराठा समाजाचे आज आंदोलन

मराठा समाजाचे आज आंदोलन

नवी मुंबई : शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याचा आरोप करीत मराठा समाजाच्या माध्यमातून राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. बुधवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात मागण्याचे निवेदन संबंधित विभागातील समन्वयकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. नवी मुंबई येथील आंदोलनासाठी मंगळवारी माथाडी भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. आरक्षणाच्या स्थगितीबद्दल मराठा समाजातील समन्वयकांनी शासनाविरुद्ध संपात व्यक्त केला.

Web Title: Today agitation of Maratha community