रोजच्या मारहाणीचा कंटाळून केली हत्या नेरुळ मधील घटना : रस्त्यालगत आढळला होता मृतदेह
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 14, 2024 17:51 IST2024-04-14T17:51:12+5:302024-04-14T17:51:34+5:30
हत्येप्रकरणी मनोजकुमार प्रजापती (४५) याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले.

रोजच्या मारहाणीचा कंटाळून केली हत्या नेरुळ मधील घटना : रस्त्यालगत आढळला होता मृतदेह
नवी मुंबई : पैशासाठी रोज होणाऱ्या मारहाणीचा कंटाळून बेघर व्यक्तीने मारहाण करणाऱ्याचाच गळा घोटाळ्याची घटना समोर आली आहे. नेरुळ येथे रस्त्यालगत एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याची उकल करून एकाला अटक केली आहे.
नेरुळ सेक्टर १० येथे रस्त्यालगत एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. शनिवारी सकाळी रस्त्यालगत एक ४५ ते ५० वयाची व्यक्ती मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले होते. त्याच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर घाव होते. यामुळे सदर व्यक्तीची हत्या झाल्याचे स्पष्ट होत होते. त्याद्वारे नेरुळ पोलिस ठाण्यात अज्ञातावर हत्येच्या गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. त्यामध्ये काही तासातच गुन्ह्याचा उलगडा करून एकाला अटक केली आहे. मृत व्यक्ती व मारेकरू दोघेही बेघर असून नेरुळ येथील रेल्वेपूल परिसरात राहणारे आहेत. तर मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्या व्यक्ती मराठी बोलणारी होती एवढे मारेकरू मार्फत समोर आले आहे. त्याच्या हत्येप्रकरणी मनोजकुमार प्रजापती (४५) याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले.
मृत व्यक्ती रोज पहाटेच्या वेळी प्रजापती याच्याकडे येऊन त्याला मारहाण करून पैशाची मागणी करत असते. शिवाय त्याच्याकडील पैसे देखील लुटून नेत असे. शनिवारी पहाटे देखील ती व्यक्ती प्रजापतीकडे पैसे मागण्यासाठी आली असता, रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या प्रजापतीने सळईने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये सदर व्यक्ती रक्तबंबाळ होऊन कोसळली असता तो निघून गेला होता. मात्र पोलिसांनी हत्येचा उलगडा करून त्याला अटक केली आहे.