शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीने मारली दडी, स्वेटर विक्रेत्यांना हुडहुडी

By admin | Updated: November 10, 2014 22:24 IST

सीमावर्ती राज्यातून ऊबदार कपडे विक्रीसाठी मुंबई ठाण्यात ठाण मांडणा:या स्वेटर विक्रेत्यांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.

ठाणो : दिवाळी सोबत आगमन करणा:या थंडीने आता नोव्हेंबरचा पहिला आठवडा झाला तरी पुरेसे आगमन न केल्याने सीमावर्ती राज्यातून ऊबदार कपडे विक्रीसाठी मुंबई ठाण्यात ठाण मांडणा:या स्वेटर विक्रेत्यांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. हवामान खाते सांगते आहे की, अजून जोरदार पडण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो. मध्यंतरी निर्माण झालेल्या वादळामुळे हे बदल वातावरणात झाले आहे. परंतु त्यांचा फटका मात्र या विक्रेत्यांना बसतो आहे. 
जे मुंबई ठाण्यात घडते आहे तेच रायगड नाशिक, औरंगाबाद, पुणो या जिल्हय़ातील घडत असल्याने या विक्रेत्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो आहे. एक दुकान चालविण्यासाठी घरातील चार व्यक्ती आणि धंदा वाढला तर स्थानिक दोन रोजंदारीवरील विक्रेते आणि रोजचा धंदा किमान दहा ते बारा हजार झाला तरच ही विक्री त्यांना परवडते. चार जणांचा रोजचा खर्च हजार ते पंधराशे असतो त्यात अडीचशे ते तीनशे रुपये स्थानिक विक्रेत्याचा रोज शिवाय जागेचे भाडे वेगळे अशी अवस्था असते. धंदा तेजीत असेल तर बाहेरचेच अन्न खावे लागते. त्यामध्ये  राईस प्लेट 1क्क् रु. आणि वडापाव किंवा तत्सम पदार्थाचा नाश्ता चहासोबत म्हटला तरी ते 1क्क् रु. होतात. म्हणजे 3क्क् रु. रोज एका व्यक्तीचा होतो. तो परवडू न लागल्याने या मंडळींनी आता काही जणांनी ग्रुप करून त्यांचे जेवण नाश्ता एकत्र बनवून कम्युनिटी किचनचा मार्ग अनुसरला आहे. यामुळे जेवणाखाण्यावरील खर्चात निम्म्याने कपात करणो त्यांना शक्य झाले आहे. 
मालाची विक्री नसल्याने साठवून ठेवलेल्या मालाचे करायचे काय? हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे. तसेच इथल्या कमाईतूनच ते गावाकडे पैसे पाठवतात. ते पाठवणो राहिले दूरच उलट त्यांनाच गावाकडून पैसे मागवावे लागण्याची वेळ ओढावली आहे. आमच्या आयुष्यात आम्ही इतका खराब सिझन कधी पाहिला नाही असे त्यांच्या प्रतिनिधीने म्हटले आहे. यावर इलाज म्हणून आता जीन्स आणि तत्सम कपडे विक्रीला ठेवण्याचा मार्ग अनुसरावा की काय? असा विचार ते करीत आहेत. यामुळे किमान रोलिंग तरी चालू राहील आणि थोडाफार खर्च भरून निघेल असा विचार ते करीत आहेत. जर नोव्हेंबरही असाच कोरडा गेला तर उरतो फक्त डिसेंबर त्यातही थंडी पुरेशी तीव्र नसेल तर संक्रांतीनंतर हिवाळा संपतोच त्यामुळे हा सगळा सिझन चिल्लर बिझीनेसवरच गेला, अशी त्यांची हालत होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)