ओल्या-सुक्या कचऱ्यात पीपीई किट फेकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 00:39 IST2020-08-01T00:39:45+5:302020-08-01T00:39:58+5:30
अमरधाम व पोदी स्मशानभूमीत गेले चार दिवस सेंसर खराब झाल्याने शववाहिनी बंद पडल्या आहेत.

ओल्या-सुक्या कचऱ्यात पीपीई किट फेकल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : मृतदेहावर अंत्यसस्कार करण्यासाठी वापरण्यात आलेले पीपीई किट अमरधाम स्मशानाबाहेर असलेल्या ओल्या-सुक्या कचºयाच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
पनवेल महापलिका क्षेत्रात प्रशासनाकडून योग्य काळजी घेतली जात असल्याचे दर्शविले जात आहे, परंतु परिस्थिती वेगळीच असल्याचे अमरधाम स्मशानभूमीच्या बाहेर फेकलेल्या पीपीई किटवरून उघड झाले आहे. कोरोनामुळे मृत व्यक्तीवर पालिकेद्वारे अंत्यसस्कार केले जातात. गुरुवारपर्यंत ४०४ मृतदेहावर शवदाहिनीवर अंत्यसस्कार केले आहे, परंतु कर्मचाऱ्यांकडून वापरात आलेले किट, मास्क, डोक्यावर वापरण्यात येणारी टोपी, हातमोजे, चष्मा अमरधाम स्मशानाबाहेरील ओला-सुका कचरा जमा करणाºया डस्टबिनमध्ये टाकले आहेत, तर काही स्मशानभूमीच्या भिंतीलगत टाकले आहे. त्याचबरोबर, वापरलेले पीपीई किट कॅरीबॅगमध्ये जमा करून रस्त्यावर फेकून देण्यात आले आहे.
अमरधाम व पोदी स्मशानभूमीत गेले चार दिवस सेंसर खराब झाल्याने शववाहिनी बंद पडल्या आहेत. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसस्कार करण्यासाठी नातेवाइकांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. सद्य परिस्थितीत लाकडांच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जात आहेत.
अमरधाम स्मशानभूमीबाहेर पीपीई किट टाकणे चुकीचे आहे. या परिसराची पाहणी करून फेकणाºयावर योग्य ती कारवाई केली जाईल. कोरोना मृत रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शवदाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडल्याने, त्या वारंवार बंद पडत आहेत. त्या लवकरच चालू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- शैलेश गायकवाड, आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका