नवी मुंबईतील कोपरखैरणेत गॅसचा स्फोट, 3 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 16:12 IST2017-10-16T00:07:52+5:302017-10-16T16:12:30+5:30
कोपरखैरणे सेक्टर 19 मधील श्री रामकृष्ण अपार्टमेंट मध्ये सिलेंडरची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे पाईपलाईन लिकेज चेकिंग करतेवेळी आज रात्री अचानक स्पोट झाला.

नवी मुंबईतील कोपरखैरणेत गॅसचा स्फोट, 3 जण जखमी
नवी मुंबई - कोपरखैरणे सेक्टर 19 मधील श्री रामकृष्ण अपार्टमेंट मध्ये सिलेंडरची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे पाईपलाईन लिकेज चेकिंग करतेवेळी आज रात्री अचानक स्पोट झाला.या स्फोटात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर वाशी मनपा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.जखमींमध्ये एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
नरेश चौधरी ,शिवा देशमुख,सीमा नायर अशी जखमींची नावे आहेत.जखमींच्या तोंडाला,हाताला गंभीर दुखापत झाली आहे.जखमींमधील नरेश चौधरी हे गॅस पाईपलाईन रिपेरिंग मकेनिक आहेत.गॅसची पाईपलाईन लिकेज झाली असल्याने नरेश चौधरी हे गॅस पाईपलाईन लिकेज चेकिंग करण्यासाठी श्री रामकृष्ण अपार्टमेंट मध्ये सीमा नायर यांच्या घरी आले होते.मात्र गॅसची पाईपलाईन लिकेज काढल्यानंतर नरेश चौधरी यांनी गॅस सुरू केला.यावेळी गॅसच्या वरील झाकन अचानक उघडून गॅसचा स्फोट झाला.या स्फोटात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.