शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तीन मजली इमारत कोसळली, तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 18:51 IST

दारावे गाव येथील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : दारावे येथील धोकादायक इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर कोसळल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. यामध्ये तळमजल्यावरील एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न गेली तीन वर्षे रखडला असल्याने दुसऱ्या मजल्यावरील घरात राहण्यायोग्य डागडुजी सुरु असताना हा प्रकार घडला. 

दारावे सेक्टर २३ येथील स्वप्न साकार इमारतीमध्ये हि दुर्घटना घडली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या ए विंग च्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला. त्यांनतर पहिल्या मजल्याचाही स्लॅब तळमजल्यावर कोसळला. या दुर्घटनेत तळमजल्यावरील घरात राहणारे सुमिता चव्हाण अनुसया चव्हाण तसेच प्रीतम चव्हाण हे जखमी झाले आहेत. त्यांना वेरूळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्याच कुटुंबातील अरुणा चव्हाण ह्या नोकरीवर गेलेल्या असल्याने त्या बचावल्या आहेत.

अनुक्रमे दुसऱ्या व पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने झालेल्या आवाजामुळे इमारतीच्या बी बिंग मधील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठवून घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार वाशी व नेरुळ अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी खबरदारी म्हणून संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले. 

सदर इमारत १९९७ साली बांधलेली असून मागील अनेक वर्षांपासून ती धोकादायक स्थितीमध्ये आहे. यामुळे सोसायटीने इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रयत्न चालवला होता. परंतु तीन वर्षांपासून त्यांच्या इमारतीच्या पुनर्बांधणीला हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे इमारतीची तसेच घरांची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून रहिवाशी जीव मुठीत धरून त्याठिकाणी राहत आहेत. अखेर बुधवारी दुपारी ए विंगच्या दुसऱ्या मजल्यावरील घरात डागडुजी सुरु असताना दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून इमारतीमधील रहिवाशांची बेलापूरच्या रात्रनिवार केंद्रात सोय केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBuilding Collapseइमारत दुर्घटना