शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 3:21 AM

कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; रस्ता चुकल्याने मदतीच्या बहाण्याने केला घात

नवी मुंबई : प्रवासात नातेवाइकांपासून ताटातूट झालेल्या महिलेवर मदतीच्या बहाण्याने दोनदा अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली असून ते महापे परिसरातील राहणारे आहेत. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग झाला.मूळच्या नाशिक येथील १९ वर्षीय नवविवाहितेसोबत हा प्रकार घडला आहे. नातेवाइकांसोबत रेल्वेने प्रवास करत असताना १९ फेब्रुवारीला कुर्ला स्थानकात तिची नातेवाइकांसोबत ताटातूट झाली. ती प्रथम घाटकोपर, मुंब्रा स्थानकात मदतीचे आवाहन करत फिरत होती. यावेळी एका रिक्षाचालकाला तिने संपूर्ण प्रकार सांगून मदत मागितली.सदर महिला अडचणीत असल्याची संधी साधून रिक्षाचालकाने तिला महापेतील बंद बसडेपोत नेऊन ठार मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला. या धक्क्यातून स्वत:ला सावरत ही महिला पुन्हा मदतीसाठी रस्त्यालगत उभी होती. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना तिने घडलेल्या कृत्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी तिला घणसोली स्थानकात सोडण्याच्या बहाण्याने स्थानकापासून काही अंतरावरील अडचणीच्या ठिकाणी नेऊन दोघांनीही तिच्यावर अत्याचार करून पळ काढला.वेगाने तपास सुरुयावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांनी निरीक्षक अनिल पाटील, सहायक निरीक्षक यशवंत पाटील, उपनिरीक्षक शरद आव्हाड, किरण पाटील आदींचे पथक तयार केले होते.