पेणमध्ये एकाच दिवशी तीन अपघात

By Admin | Updated: October 18, 2014 22:24 IST2014-10-18T22:24:17+5:302014-10-18T22:24:17+5:30

पेणच्या राष्ट्रीय महामार्गावर रामवाडी ब्रीज व वाशीनाका या ठिकाणी मोटारसायकल व सॅन्ट्रो कारच्या अपघातात मोटारसायकलवरील 3 जण जखमी झालेत,

Three accidents in one day in Pen | पेणमध्ये एकाच दिवशी तीन अपघात

पेणमध्ये एकाच दिवशी तीन अपघात

पेण : पेणच्या राष्ट्रीय महामार्गावर रामवाडी ब्रीज व वाशीनाका या ठिकाणी मोटारसायकल व सॅन्ट्रो कारच्या अपघातात मोटारसायकलवरील 3 जण जखमी झालेत, तर पेण-खोपोली रस्त्यावर बसची मारुती ए स्टार कारला धडक बसून झालेल्या अपघातात कामशेत-तळेगाव पुणो येथील प्रिया o्रीनिवास (वय 28) ही जागीच ठार तर कारमधील चार जण गंभीर जखमी झालेत. एकंदर शनिवारी दिवसभरात तीन ठिकाणी अपघात होऊन 1 ठार 7 जखमी झाले असून शनिवार अपघातवार ठरला आहे.
पेण-खोपोली रस्त्यावर आंबेघर गावाजवळील वळणावर पेण-खोपोली बस पेणकडून खोपोलीकडे जात असताना मारुती ए-स्टार क्रमांक एमएच-14-बीएक्स-8612 कारला वळणावर एसटी बस क्रमांक एमएच-2क्-डी-8438 धडक लागल्याने कारमधील प्रिया o्रीनिवास ही जागीच ठार झाली, तर कारमधील कविता धुमाळ (27), धीरज रामबहादूर ठाकूर (2क्), करण विलास रावल (21) व परिक्षित भालेराव (29) हे सर्व पुणो-कामशेत येथील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वाना तातडीने अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रामवाडी ब्रीजवर सॅन्ट्रो कार व मोटारसायकल यांच्यात धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील o्रीवर्धन-दिघी येथील नतीफ तळवसकर (38) गंभीर जखमी झालेत, तर वाशीनाका-3 चेडे येथे मोटारसायकलला कारने धडक दिल्याने मळेघर-पेण येथील सुभाष पाटील (54) हे गृहस्थ जखमी झालेत. 
या सर्व अपघातांची पेण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, अपघातात जखमी झालेल्या सर्व जखमींना पेण ग्रामीण रुग्णालय व वैरागी  हॉस्पिटल पेण येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, तर पुणो-कामशेत-तळेगाव येथील जखमींना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. 
(वार्ताहर)

 

Web Title: Three accidents in one day in Pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.