प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने ये-जा करणाऱ्या भाविकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:35 PM2024-03-08T21:35:19+5:302024-03-08T21:35:32+5:30

तिकीटापेक्षा ज्यादा रकमेच्या वसुलीमुळे भाविक संतप्त : मोरा बंदरात प्रवासी बोट चिखलात रुतून बसल्यामुळे भाविकांचे हाल

Thousands of devotees coming to Gharapuri Island on the occasion of Mahashivratri are affected by the sloppy and unplanned management of the administration | प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने ये-जा करणाऱ्या भाविकांना फटका

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने ये-जा करणाऱ्या भाविकांना फटका

मधुकर ठाकूर/ उरण :  महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर ये-जा करणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे.संध्याकाळी ४ नंतर तर काही बोटी उरण-मोरा बंदरातच चिखलात रुतून बसल्यामुळे आणि ठरवुन दिलेल्या एकेरी ६५ रुपये तिकीट ऐवजी बोट चालकांकडून ७०-८० वसुल केल्याने घारापुरी बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षीही आणखीनच कमी झाली आहे.प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र हजारो शिवभक्तांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरवर्षी घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बोटींच्या एकेरीच्या तिकिट दरात वाढ केली जात असल्याने बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्याही कमी होत चालली आहे.याबाबत खंत आणि चिंता व्यक्त करून भाविकांना कमी खर्चात दर्शन घडविण्यासाठी यावर्षी तिकिट दर कमी करण्याची  विनंती घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी प्रादेशिक बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती.

  ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर महाशिवरात्रीला बेटावर येणाऱ्या भाविकांसाठी बंदर विभागाकडून तिकिट दरात कोणत्याही प्रकारची वाढ न करता यावर्षीही सुमारे ३०० ते ५०० प्रवासी वाहतूक क्षमतेच्या सहा मच्छीमार बोटींची व्यवस्था केली होती.यासाठी बंदर विभागाने एकेरीसाठी ६५ तर दुहेरी परतीच्या प्रवासासाठी १३० असा तिकीट तिकीट दर ठरवून दिला होता.मात्र तिकीट दर ठरवून दिल्यानंतरही  बोट चालकांकडून एकेरीसाठी ७०-८० तर परतीच्या प्रवासासाठी १४०-१६० रुपयांपर्यंत  मनमानीपणे तिकीट दर आकारणी करीत होते.त्याशिवाय तिकिटही दिले जात नव्हते.बोटचालकांच्या मनमानी तिकीट दर वसुलीमुळे मात्र महाशिवरात्री निमित्ताने बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षीही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून येत आहे.तिकिट दर ठरवून दिल्यानंतरही बोटचालक बंदर, पोलिस व इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगत मनमानीपणे पैसे वसूल करीत होते.मात्र बोट चालकांचा मनमानी कारभार आणि त्यांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांबद्दल भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 महाशिवरात्री निमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती.मात्र राजबंदर जेट्टीवरुन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या भाविकांना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.राजबंदर जेट्टीवर संध्याकाळी ४ नंतर प्रशासनाचे नियोजन ढासळल्याने जेएनपीए व उरण- मोराकडे निघालेल्या भाविकांना एका बोटीवरुन दुसऱ्या बोटीवर जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.या गोंधळामुळे जेएनपीटीकडे जाणारे भाविक मोरा बोटीत तर मोरा बंदराकडे जाणारे भाविक जेएनपीटीच्या बोटीत अडकून पडल्याने महिला, आबालवृद्धांचे अतोनात हाल झाले.

हा गोंधळ संपतो ना संपतो तोपर्यंत समुद्रातील ओहटीमुळे मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी व बोटी लागण्यासाठी पाणीच नसल्याने बंदर अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात भाविकांना सोडण्यासाठी निघालेल्या काही बोटी मोरा बंदरापासून अर्धा किमी अंतरावर चिखलात रुतून बसल्या होत्या.मोठ्या मुश्किलीने खचाखच भाविकांनी भरलेल्या राम अयोध्या आणि जय गणेश या बोटी बंदरापर्यत पोहचल्या खऱ्या. मात्र  बंदरात पुरेश्या प्रमाणात पाणी नसल्याने मात्र मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी मोठ्या शेकडो भाविकांसह बोट चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागली.प्रशासनाचा ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराबाबत मात्र  शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Web Title: Thousands of devotees coming to Gharapuri Island on the occasion of Mahashivratri are affected by the sloppy and unplanned management of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.