रविवारी मेगाब्लॉक नाही

By Admin | Updated: September 6, 2014 01:20 IST2014-09-06T01:20:06+5:302014-09-06T01:20:06+5:30

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून गणोशभक्तांसाठी एक खूशखबर देण्यात आली आहे. या रविवारी मेगा आणि जम्बोब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.

There is no megablock on Sunday | रविवारी मेगाब्लॉक नाही

रविवारी मेगाब्लॉक नाही

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून गणोशभक्तांसाठी एक खूशखबर देण्यात आली आहे. या रविवारी मेगा आणि जम्बोब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. शहर आणि उपनगरात मोठय़ा प्रमाणात सार्वजनिक गणपती असून त्याच्या दर्शनासाठी गणोशभक्त रविवारी बाहेर पडतील. त्यामुळे या गणोशभक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 
31 ऑगस्ट रोजी गणोशोत्सवानिमित्त आणि 10 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त मेगा आणि जम्बोब्लॉक घेण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदाही रेल्वेने ब्लॉकमधून प्रवाशांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणो पश्चिम रेल्वेकडून अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्यरात्री विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही एक विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिवशी मध्यरात्री सीएसटी येथून दीडच्या सुमारास कल्याणसाठी एक धिमी लोकल सोडण्यात येईल. ही लोकल पहाटे तीनच्या सुमारास पोहोचेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.  

 

Web Title: There is no megablock on Sunday