वाशी, नेरुळमध्ये आज वीज नाही

By Admin | Updated: June 17, 2016 00:56 IST2016-06-17T00:56:18+5:302016-06-17T00:56:18+5:30

वाशी आणि नेरुळ विभागातील वीज वाहिनीचे काम हाती घेण्यात आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे वाशी आणि नेरुळमधील काही परिसरात शुक्रवारी १७ जून रोजी वीजपुरवठा खंडित केला

There is no electricity in Vashi, Nerul today | वाशी, नेरुळमध्ये आज वीज नाही

वाशी, नेरुळमध्ये आज वीज नाही

नवी मुंबई : वाशी आणि नेरुळ विभागातील वीज वाहिनीचे काम हाती घेण्यात आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे वाशी आणि नेरुळमधील काही परिसरात शुक्रवारी १७ जून रोजी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. वाशीतील काही परिसराचा वीजपुरवठा दुपारी दोन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तर घणसोली गाव, तळवली गाव आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. महापे परिसरातील वीजपुरवठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान बंद राहणार आहे. सानपाडा सेक्टर १ ते १४, सानपाडा गाव, शिरवणे गाव आदी परिसराचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महावितरण विभागाने दिली.

Web Title: There is no electricity in Vashi, Nerul today