शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

रुळात अडकलेल्या प्रवाशाला वाचविण्यासाठी हलवली लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 9:18 AM

वाशी स्थानकात रुळ ओलांडताना अपघात, लांबपर्यंत नेले फरफटत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकामध्ये सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी रेल्वेच्या धडकेने फलाट व रुळामधील अंतरात अडकून पडला. त्याला वाचविण्यासाठी प्रवाशांनी चक्क रेल्वे हलवण्याचा प्रयत्न करून त्याला बाहेर काढले. लांबपर्यंत फरफटत नेल्याने जखमी झालेल्या प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले आहे. 

कोपरखैरणे यथे राहणारे राजेंद्र खांडके (४८) हा रेल्वेने मुंबईला जात होता. लोकल पकडण्यासाठी फलाट क्रमांक दोनवरून तीनवर जाण्यासाठी भुयारी पादचारी मार्गाचा वापर न करता थेट दोन फलाटांमधील रुळावर त्याने उडी मारली. नेमकी त्यावेळी पनवेलकडे जाणाऱ्या लोकलची त्याला धडक बसली. तो काही अंतरापर्यंत रेल्वेसोबत फरफटत गेल्याने फलाट व रूळमधील अंतरामध्ये अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी धावलेल्या प्रवाशांनी रेल्वेला हलवण्याचा प्रयत्न केला.

एकीच्या बळामुळे लोकलचा डबा हलवलाएकीच्या बळामुळे रेल्वेचा डबा काहीसा वाकडा करून राजेंद्र खांडके याला बाहेर काढून तातडीने वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले. रेल्वेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले. 

रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी फलाट व रूळ यामधील अंतरात अडकला होता. यावेळी रेल्वे पुढे-मागे करणे शक्य नव्हते. अनेक प्रयत्नांनंतर रेल्वेखाली अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. - सचिन कटारे, पोलिस निरीक्षक, वाशी रेल्वे पोलिस

शॉर्टकर्ट बेततोय जीवावरचार दिवसांपूर्वीच जुईनगर रेल्वे स्थानकातदेखील रेल्वे प्रवाशाने रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात थेट रेल्वेसमोर रुळावर उडी मारली होती. यावेळी आरपीएफ जवानाच्या प्रयत्नामुळे त्यांचे प्राण वाचले होते. रेल्वे स्थानकातून बाहेर जाण्यासाठी रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानकाच्या दोन्ही टोकांकडील फलाटावर बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे काही प्रवासी थेट फलाटावरूनच रुळावर उडी मारून एकीकडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये त्यांच्या जीविताला धोका होत असल्याने रेल्वे प्रवाशांच्या शॉर्टकटला प्रतिबंध कसा घालायचा, असा प्रश्न रेल्वे पोलिसांना पडला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईrailwayरेल्वेlocalलोकल