शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आणि बेभरवशी पावसामुळे उरणचे शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 21:02 IST

प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.

मधूकर ठाकूर, उरण : हवामान खात्याने यावर्षी महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल. हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे उरणकरांची चिंता वाढली आहे.

उरण तालुक्यात मागील पाच वर्षांपासून पावसाचा खेळ खंडोबा सुरू आहे.प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.त्यामध्ये आता अवकाळी, अवचित कोसळणाऱ्या पावसाची भर पडली आहे. ॠतु,बेॠतुत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.अधुन-मधुन शेतकऱ्यांना वादळं, चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागत आहे.मानवाने निसर्ग आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे.त्यामुळे निसर्गाचे

ॠतुचक्रच बिघडले आहे.बिघडलेल्या ॠतुचक्राचा   निसर्ग आणि मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला असल्याचे तज्ञांकडून वारंवार सांगितले जात आहे.मात्र तज्ञांचे सल्ले मानव फारसे मनावर घेताना दिसत नाही.त्याचे परिणाम हळूहळू आता जाणवू लागले असल्याचे पर्यावरणवाद्यांकडून सांगितले जात आहे. 

दरम्यान उरण परिसरात मागील पाच वर्षांपासून कोसळणाऱ्या कमी अधिक पावसामुळे उरणकरांना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.तसेच शेतकऱ्यांसाठीही हा चिंतेचा विषय बनला आहे.यासाठी उरण तालुका कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी मागील पाच वर्षांतील पावसाची आकडेवारीच दिली आहे. उरण तालुक्यातील मागील पाच वर्षांची आकडेवारीवर्ष               आकडेवारी २०१८.       २२८७.९७ मी.मि.२०१९.        ३४१०.५० मी.मि.२०२०.        २४२७. मी.मि.२०२१.        २९२२. मी.मि.२०२२.         २६३४. मी.मि.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण