शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

माझ्यावरील दाखल गुन्हे हे राजकीय कारस्थानाचा भाग; गणेश नाईकांचा पहिल्यांदाच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:07 AM

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात शहरातील विविध प्रश्नांवर आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी त्यांना एका महिलेने केलेल्या बलात्कार आणि जिवे ठार मारण्याच्या धमकीसंदर्भात छेडले असता वरील शब्दांत त्यांनी पहिल्यांदाच आपले म्हणणे मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गेल्या २५ वर्षांत आपली राजकीय कारकीर्द संपविण्याचे उद्दिष्ट विरोधकांना साध्य झालेले नाही.  आता जे आरोप करण्यात आलेले आहेत, ते एका कारस्थानाचा भाग आहेत, असा दावा करून तपासयंत्रणा आणि न्यायपालिकेच्या प्रक्रियेतून बाहेर पडल्यानंतर मी पत्रकारांशी संवाद साधेन, असे स्पष्टीकरण माजी मंत्री  आणि भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी दिले आहे.

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात शहरातील विविध प्रश्नांवर आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी त्यांना एका महिलेने केलेल्या बलात्कार आणि जिवे ठार मारण्याच्या धमकीसंदर्भात छेडले असता वरील शब्दांत त्यांनी पहिल्यांदाच आपले म्हणणे मांडले.

आयुक्तांच्या भेटीप्रसंगी गणेश नाईक यांच्यासमवेत माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार  संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, नगरसेवक अनंत सुतार, डॉ. जयाजी नाथ, सूरज पाटील, अशोक पाटील, अमित मेढकर, नगरसेविका नेत्रा शिर्के यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रकरणात जे आरोप करण्यात आलेले आहेत, त्यातून माननीय न्यायालयाने मोकळीक देताना काही बंधने घातली आहेत. ती पूर्णत: मी पाळणार आहे. संपूर्ण तपासयंत्रणा आणि न्यायपालिकेच्या प्रक्रियेतून निर्दोष बाहेर पडल्यानंतर या विषयावर ‘दूध का दूध’ आणि ‘पानी का पानी’ झाल्यावर मी पत्रकारांजवळ सविस्तर माझे म्हणणे मांडेन, असे  सांगून त्यांनी  अधिक बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक