शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या महापौरांना तीन हजार रुपये दंड!

By admin | Updated: January 5, 2016 03:04 IST

शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात, आरोपी असलेले ठाण्याचे महापौर संजय मोरे हे या सुनावणीसाठी सोमवारी उशिरा

ठाणे : शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात, आरोपी असलेले ठाण्याचे महापौर संजय मोरे हे या सुनावणीसाठी सोमवारी उशिरा दाखल झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना चांगलेच फैलावर घेतले, शिवाय त्यांना न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी तीन हजारांचा दंडही ठोठावला आहे.नारायण राणे यांच्यापाठोपाठ ठाण्यातील त्यांचे समर्थक रवींद्र फाटक काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी काही शिवसेना शाखांवर कब्जा मिळविला. किसननगर भागातील महाराष्ट्रनगर येथील शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याच्या वादामध्ये २००५ मध्ये उद्भवलेल्या वादात काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला होता. त्यात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील हल्लेखोरांविरुद्ध हाणामारी, शिवीगाळ, तसेच खुनाचा प्रयत्न करणे, असे गुन्हे दाखल झाले होते. ठाणे महापालिकेचे तत्कालीन शिक्षण मंडळ सदस्य संजय मोरे यांच्यासह ३० आरोपींचा यामध्ये समावेश होता. त्यातील ५ जणांचा मृत्यूही झाला आहे. सोमवारच्या सुनावणीच्या वेळी महापौर असलेल्या मोरे यांच्यासह आठ आरोपींना समन्स बजावण्यात आले होते. न्यायालयाने पुकारा केल्यानंतर मोरेवगळता उर्वरित सर्व हजर झाले होते. मात्र, त्यांचा पुकारा करूनही ते उपस्थित न राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांना अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिले. ही प्रक्रिया सुरू असतानाच, तिथे महापौर अत्यंत धावपळीत हजर झाले. न्यायालयाने त्यांना उशिरा आल्याबद्दल खडेबोलही सुनावून तीन हजारांचा दंडही भरण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या काही महत्त्वाच्या कामांमुळे आपल्याला हा उशीर झाल्याचे निवेदनही त्यांनी न्यायालयाला दिले. जिल्हा सरकारी वकील इब्राहिम कादरी यांनी या वेळी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.