शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

दोन गटातील दुहीवर प्रचाराची जबाबदारी वाटपाचा उतारा; भाजपानं काढला तोडगा

By नारायण जाधव | Published: April 08, 2024 8:19 PM

संदीप नाईकांना ऐरोली तर मंदा म्हात्रेंवर बेलापूरची जबाबदारी : ठाण्यातील मतदारसंघात नियुक्त्या

नवी मुंबई : महायुतीच्या उमेदवारांना त्या त्या शहरांतील विधानसभा मतदारसंघात असलेल्या भाजपातील दोन-तीन गटांतील दुहीचा फटका बसू नये, यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखेर त्या त्या नेत्यांना विशिष्ट मतदारसंघाची जबाबदारीवाटपाचा शोधला आहे. यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या नवी मुंबईतील गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या पक्षांतील दोन आमदारांत असलेल्या मतभेदांचा प्रचारावर परिणाम होऊ नये, यासाठी दोन्ही गटांना जबाबदारी वाटून दिली आहे.

नव्या जबाबदारीनुसार ऐरोली विधानसभा मतदारसंघात पक्षाचे नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह प्रवक्ते अजित चव्हाण आणि माधुरी सुतार यांना नेमले आहे. तर बेलापूर विधानसभेची जबाबदारी आमदार मंदा म्हात्रेंसह सरचिटणीस विक्रांत पाटील, रामचंद्र घरत आणि दत्ता घंघाळे यांना दिली आहे.

शक्ती केंद्राच्या नेत्यांनी काय करावेशक्ती केंद्र, असे नव्या जबाबदारींचे नामकरण केले असून त्यात विधानसभा मतदारसंघनिहाय नेते नेमले आहेत. या नेत्यांनी काय करावे, याचे सविस्तर पत्रही बावनकुळे यांनी पाठवले आहे. यानुसार आपल्या विधानसभा मतदारसंघातील शक्ती केंद्रासासाठी नियुक्त केलेल्या वक्त्यांशी संपर्क साधून त्यांच्या प्रवासाची तारीख, वेळ निश्चित करावी, संबधित वक्त्यांनी रोज किमान सात ते आठ सभा करून घ्याव्यात, नमो संवाद काॅर्नर सभा जास्तीत जास्त ४५ मिनिटे ते एका तासात संपेल, याची काळजी घ्यावी, भाषणात नरेंद्र मोदींचे काम, योजना या संदर्भातील मुद्दे असावेत. इतर मुद्यांवर सभा भरकटू देऊ नये, सभांची माहिती सोशल मीडिया हँडलवर प्रसारीत करावी. कॉर्नर सभांचे स्थळ त्वरीत सुपर वॅरिअर्स, शक्ती केंद्र प्रमुख यांच्याशी बोलून निश्चित करावे, सभा संपताच त्वरीत तिची माहिती सरल ॲपवर अपलोड करावी, असे बजावण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातही नेमले शक्ती केंद्र प्रमुखनवी मुंबई प्रमाणेच मीरा-भाईंदरमध्ये सतीश निकम, श्वेता शालिनी, वर्षा भोसले यांना तर ओवळा-माजीवडा मतदारसंघात मनोहर डुंबरे, स्नेहा पाटील, ज्योत्स्ना हसनाळे यांना नेमले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात संजय वाघुले, मृणाल पेंडसे कृष्णा भुजबळ यांना तर ठाणे मतदारसंघात माधवी केळकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि सुभाष काळे यांना नेमले आहे.

टॅग्स :thane-pcठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा