शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोकण भवनात मुदत संपलेली अग्निरोधक यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 02:08 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : अधिकारी, नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर

योगेश पिंगळेनवी मुंबई : सीबीडीतील कोकण भवन येथे आपत्कालीन सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या अग्निरोधक यंत्रणेची मुदत जानेवारी महिन्यातच संपली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.राज्य शासनाच्या विविध सुमारे ७२ विभागाची कार्यालये असलेल्या सीबीडी येथील कोकण भवनला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. या इमारतीमध्ये कोकण आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुप्तचर विभाग, माहिती उपसंचालक, विक्र ीकर, महसूल खाते, जातपडताळणी, आयुक्तालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभाग, निवडणूक विभाग, पोस्ट आॅफिस, दुय्यम निबंधक कार्यालय आदी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी काम करीत असून विविध कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. सुरक्षेच्या दृष्टीने या इमारतीच्या आतील बाजूला प्रत्येक मजल्यावर विविध सुमारे २८५ ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या अग्निरोधक यंत्रणेची दरवर्षी तपासणी करणे आवश्यक असते. कोकण भवन इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या अग्निरोधक यंत्रणेची मुदत १४ जानेवारी २०१९ रोजी संपलेली आहे; परंतु या यंत्रणेच्या तपासणीकडे दुर्लक्ष झाल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अद्ययावत यंत्रणेचा समावेश होणारकोकण भवनमधील अग्निरोधक यंत्रणा जुनी झाली आहे, या यंत्रणेची तपासणी करण्यात यावी, तसेच शक्य असल्यास यंत्रणेचे नूतनीकरण करण्यात यावे, असा प्रस्ताव सार्वजनिक विभागाला पाठविण्यात आला आहे. तसेच अगिरोधक यंत्रणा हाताळणे थोडे कठीण असल्याने या अग्निरोधक यंत्रणेसोबत अद्ययावत फायर बॉल यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कोकण भवनमध्ये अत्याधुनिक फायर बॉल यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBJPभाजपाfireआग