शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दिवाळीसाठी भारतीय बनावटीच्या वस्तुखरेदीकडे कल, कंदील, पणत्या विक्रीसाठी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:24 AM

Diwali News : भारतीय सणांमध्ये सर्वात मोठा सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणावरही कोविडचे सावट आहे. अनलॉक सुरू झाल्याने बाजारपेठा सजण्यास सुरुवात झाली आहे.

पनवेल - दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच सणांवर कोविडचे सावट आहे. यामुळे नागरिकांमध्येही काही प्रमाणात भीती आहे. भारतीय सणांमध्ये सर्वात मोठा सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणावरही कोविडचे सावट आहे. अनलॉक सुरू झाल्याने बाजारपेठा सजण्यास सुरुवात झाली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचे कंदील, पणत्या बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या दिसून येत असून, या वर्षी नागरिकांचा कल भारतीय बनावटीच्या वस्तुखरेदीकडे जास्त असल्याचे दिसून येत आहे.भारतीय बाजारपेठेवर नेहमीच चीनच्या वस्तुंचा दबदबा असल्याचे पाहावयास मिळत आहे. आकर्षक आणि भारतीय वस्तुंच्या तुलनेत स्वस्त असल्याने, या वस्तुखरेदीसाठी ग्राहकाकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत होते. मात्र, या वर्षी चीनने सीमेवर केलेली कुरघोडी, स्वदेशी वापराबाबत सुरू झालेल्या जनजागृतीमुळे नागरिकांचा कल स्वदेशीकडे दिसत आहे. पनवेलमधील बाजारपेठेत स्वदेशी बनावटीच्या पणत्या, कंदील पाहावयास मिळत आहे. ५० रुपये प्रति डझन ते ३०० रुपयेपर्यंत प्रति डझनपर्यंत पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पनवेलमधील युसुफ मेअर अली सेंटरमध्येही भारतीय बनावटीच्या पणत्या तयार केल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे मॅजिक लॅम्प नामक या विशिष्ट पणतीची मागणी या वर्षीही कायम असल्याचे या ठिकाणी काम करणारे हस्तकलाकार प्रकाश तांबे यांनी सांगितले.

दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईत मॉल पडले ओस  नवी मुंबई : शहरातून कोरोनाचा प्रभाव कमी होत असतानाही नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे अद्यापही टाळत आहेत.  यामुळे ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला शहरातील मॉल ओस पडल्याचे दिसून येत आहे, तर खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर देऊनही ग्राहक पाठ फिरवत असल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. मागील सहा महिन्यांपासून शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत होता. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे शहरातील जनजीवन पूर्ववत होत चालले आहे, परंतु मॉल सुरू होऊन एक महिना होत आला, तरीही अद्याप ग्राहकांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. परिणामी, ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येवरही मॉल ओस पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना लुभावण्यासाठी मॉलवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर मॉलमधील व्यावसायिकांनी खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर घोषित केल्या आहेत. त्यानंतरही मोजकेच ग्राहक मॉलमध्ये पाऊल टाकत आहेत. यामुळे आजवर सतत गजबजलेले दिसणारे मॉल पुन्हा त्याच ओघाने ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु मॉलमधील खाद्यपदार्थांची ठिकाणे व लहान मुलांच्या खेळण्याची ठिकाणे अद्यापही बंदच असल्याने, खरेदीच्या व्यतिरिक्त मॉलला भेट देणाऱ्यांची संख्या घटली आहे. याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याने मॉलमधील अनेक छोटे-मोठे व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. अनेकांवर व्यवसाय बंद करण्याचीही वेळ ओढावण्याची शक्यता आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीNavi Mumbaiनवी मुंबई