टेम्पो -दुचाकीच्या धडकेत एक ठार

By Admin | Updated: February 14, 2017 04:31 IST2017-02-14T04:31:18+5:302017-02-14T04:31:18+5:30

मुरुड-जंजिरा तालुक्यातील साळाव-रोहा मार्गावरील जे.एस.डब्ल्यू प्रकल्पाच्या समोरील रस्त्यावर टेम्पो व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक

Tempo - A killer in the scuffle | टेम्पो -दुचाकीच्या धडकेत एक ठार

टेम्पो -दुचाकीच्या धडकेत एक ठार

रेवदंडा : मुरुड-जंजिरा तालुक्यातील साळाव-रोहा मार्गावरील जे.एस.डब्ल्यू प्रकल्पाच्या समोरील रस्त्यावर टेम्पो व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघातात एकीचा मृत्यू व दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टेम्पो रोह्याकडून साळावकडे येत असताना साळावकडून रोह्याकडे भरधाव वेगाने दुचाकी जात असताना दुचाकीस्वारांनी टेम्पोला धडक दिली. त्यात दुचाकी चालविणाऱ्या पूजा पाटील या गंभीर जखमी झाल्या, तसेच त्यांच्यासमवेत असलेले सर्वेश पाटील व देविदास कोटकर (तिघेही रा. न्हावे, ता. रोहा) जखमी झाले. यातील पूजा पाटील यांना पुढील उपचारासाठी अलिबाग नेण्यात आले होते, परंतु त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी टेम्पो चालक चंद्रकांत पाटील (२३, रा. सावरोली-चोरडा ता. मुरुड-जंजिरा) यांनी पोलिसात फिर्याद दिली. (वार्ताहर)

Web Title: Tempo - A killer in the scuffle