तालुका क्रीडा संकुल लवकरच खुले होणार

By Admin | Updated: March 22, 2017 01:39 IST2017-03-22T01:39:24+5:302017-03-22T01:39:24+5:30

अनेक अडथळे दूर करून अखेर पनवेलचे तालुका क्रीडा संकुल पूर्णत्वास आले आहे. हे क्रीडा संकुल पनवेलच्या खेळाडूंसाठी वरदान

Taluka Sports Complex will be open soon | तालुका क्रीडा संकुल लवकरच खुले होणार

तालुका क्रीडा संकुल लवकरच खुले होणार

पनवेल : अनेक अडथळे दूर करून अखेर पनवेलचे तालुका क्र ीडा संकुल पूर्णत्वास आले आहे. हे क्र ीडा संकुल पनवेलच्या खेळाडूंसाठी वरदान ठरेल, त्यामुळे संकुलाच्या उद्घाटनाची वाट न पाहता, खेळाडूंनी त्याचा वापर सुरू करावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. मंगळवारी त्यांनी पत्रकारांसोबत तालुका क्रीडा संकुलाची पाहणी केली.
पनवेल परिसरातील विद्यार्थी व नवोदित खेळाडूंना हक्काचे क्रीडा संकुल मिळाले पाहिजे, यासाठी प्रशांत ठाकूर यांनी सरकारकडे मागणी केली होती, तसेच त्याचा पाठपुरावाही केला. संकुलाच्या कामाला उशीर होत असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करून याकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
अनेक अडचणींवर मात करीत पनवेलमधील साईनगर येथे दिमाखदार तालुका क्र ीडा संकुल उभे राहिले आहे. दोन दिवसात बॅडमिंटन कोर्ट तयार होणार असून पनवेलच्या खेळाडूंनी याचा वापर सुरू करावा, असे आवाहन ठाकूर यांनी संकुलाच्या पाहणीनंतर केले आहे.
भाजपाचे युवा नेते परेश ठाकूर, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, मनोहर म्हात्रे, श्रीकांत ठाकूर, उद्योजक आघाडी जिल्हा संयोजक नितीन मुनोत, युवा नेते संजय जैन, काका भगत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नरेश पवार, अभाविप जिल्हा संयोजक मयुरेश नेतकर, पूनम कल्याणकर, सचिन पाटील, यांच्यासमवेत इतर अधिकारी तसेच युवा, महिला व ज्येष्ठ नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिडको वसाहतींमध्येही क्रीडा संकुल उभारण्याची मागणी केली होती, मात्र त्यात सिडकोच अपयशी ठरली आहे. म्हणूनच महापालिकेची मागणी केली असून आता नगरसेवकांच्या माध्यमातून अशा प्रकारची क्रीडा संकुले खारघर, कामोठे, कळंबोली येथेही निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. हे संकुल समारंभांसाठी वापरता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी या वेळी स्पष्ट केली. (प्रतिनिधी)

Web Title: Taluka Sports Complex will be open soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.