कर्जतच्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: July 16, 2016 02:03 IST2016-07-16T02:03:37+5:302016-07-16T02:03:37+5:30

कर्जत तालुक्यातील दर्शना कांता धुळे (३८) या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून महिलेच्या कुटुंबीयांनी या मृत्यूला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

Suspicious death of Karjat married | कर्जतच्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

कर्जतच्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

नेरळ : कर्जत तालुक्यातील दर्शना कांता धुळे (३८) या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून महिलेच्या कुटुंबीयांनी या मृत्यूला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून महिलेचा पती कांता नाना धुळे तसेच सासू व सासऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शर्मिला रामचंद्र कराळे (रा. बेकर) हिचा ४ मे २००८ मध्ये कर्जत तालुक्यातीलच बार्णे गावातील कांता नाना धुळे यांच्याशी विवाह झाला होता. तिला नेत्रा (३)व यज्ञश (नऊ महिने) ही दोन अपत्ये आहेत. लग्नानंतर काही वर्षे तिचा संसार सुखाने चालला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. शुक्र वारी सकाळी ७ वाजता शर्मिलाचे वडील रामचंद्र कराळे यांना तुमच्या मुलीने विष पिल्याने तिला उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रु ग्णालयात आणले असल्याचे सासरच्या मंडळींनी कळविले. रुग्णालयात पोहोचताच शर्मिलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आपली मुलगी नऊ महिन्यांच्या तान्ह्या मुलाला सोडून कशी काय आत्महत्या करू शकते, असा प्रश्न शर्मिलाच्या माहेरच्यांना पडला आहे. मुलीला सासरच्या मंडळींनीच तिचा छळ करून तिला आत्महत्येस भाग पाडल्याची तक्रार कुटुंबीयांनी कर्जत पोलीस ठाण्यात केली आहे. जोपर्यंत सासरच्या मंडळींना ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत शव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका शर्मिलाच्या कुटुंबीयांनी घेतल्याने पोलिसांनी तिचे पती व सासू-सासऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Suspicious death of Karjat married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.