पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी सूरदास राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:51 IST2023-10-14T13:51:45+5:302023-10-14T13:51:56+5:30
शिक्षण क्षेत्रात रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांवर शिक्षक पदावर कार्यरत असताना अनेक शिक्षक सहकाऱ्यांच्या समस्या निवारण करण्याचे काम केले आहे.

पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी सूरदास राऊत
मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील चिरनेर येथील काळुराम धाकू खारपाटील कनिष्ठ महाविद्यालय व परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले कळंबूसरे गावातील सूरदास राऊत यांची नुकतीच पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रात रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांवर शिक्षक पदावर कार्यरत असताना अनेक शिक्षक सहकाऱ्यांच्या समस्या निवारण करण्याचे काम केले आहे. शाळा संहिताची कायदेशीर बाब अनेक शिक्षकांपर्यंत पोहोचवली आहे.शिक्षक सहकाऱ्यांची प्रलंबित कामे पूर्णतःवास नेण्यासाठी त्यांची कामाची धडपड, प्रामाणिकपणा तडजोड न करण्याच्या कामांमुळेच पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी सूरदास राऊत यांची निवड झाली आहे.