आयुक्तांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:39 IST2018-04-18T01:39:43+5:302018-04-18T01:39:43+5:30

महापालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ, शिवसेनेच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले.

In support of the commissioners, the front of Shiv Sena's Tehsil office | आयुक्तांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

आयुक्तांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

पनवेल : महापालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ, शिवसेनेच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले.
कारभारात मनमानी करायला मिळत नसल्यानेच सत्ताधारी भाजपाने प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी घेतल्याची चर्चा सध्या पनवेलकरांमध्ये आहे, अशी टीका सेनेचे संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी केली. आयुक्तांच्या कामाच्या धडाक्याने सत्ताधाºयांना शिंदे यांची अडचण वाटल्यानेच सत्ताधाºयांकडून अविश्वासाचा ठराव आणण्यात आला. मात्र, शासनाकडून तो ठराव फेटाळण्यात आल्यानंतर फक्त राजकीय ताकदीच्या जोरावर शिंदे यांची बदली करण्यास पनवेलमधील सत्ताधाºयांनी शासनाला भाग पाडले, असा उल्लेख सेनेने दिलेल्या निवेदनात केला असून, शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. या वेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजय मोरे, सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, ग्राहक कक्ष जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, तालुका संपर्कप्रमुख रामदास पाटील उपस्थित होते.

Web Title: In support of the commissioners, the front of Shiv Sena's Tehsil office

टॅग्स :panvelपनवेल