प्रेयसी, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 04:59 AM2019-11-10T04:59:37+5:302019-11-10T04:59:41+5:30

पहिल्या पतीच्या दोन वर्षांच्या मुलीसह प्रेयसी व प्रियकराने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पनवेलमधील समीर हॉटेलमध्ये शनिवारी घडला.

A suicide attempt at a lover, a lover | प्रेयसी, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रेयसी, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

पनवेल : पहिल्या पतीच्या दोन वर्षांच्या मुलीसह प्रेयसी व प्रियकराने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पनवेलमधील समीर हॉटेलमध्ये शनिवारी घडला. यात दोन वर्षांची मुलीचा मृत्यू झाला असून प्रेयसी व प्रियकरावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केरळ येथून रिजोश कुरियन हत्या करून त्याची पत्नी लिजी कुरियन व तिचा प्रियकर वाशीम कादिर हे तिच्या दोन वर्षांच्या जोहाना या मुलीसह समीर हॉटेलमध्ये आले होते. शनिवारी ते रूम सोडून जाणार होते. मात्र, दुपारचे १२ वाजून गेले तरी त्यांनी चेक आउट केले नाही. त्यामुळे हॉटेलच्या वेटरने त्यांचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपल्याकडील दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. या वेळी तिघेही बेशुद्धावस्थेत आढळले. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. तिघांनाही रुग्णालयात दाखल केले. यात जोहानाचा मृत्यू झाला असून, ते दोघे बेशुद्ध अवस्थेत आहेत. पोलीस उपायुक्त अशोक दुधे, वपोनि अजयकुमार लांडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केल्यावर घटनेतील दोघांनी एकाची हत्या केल्याचे समोर आले.
लिजी आणि वाशीम हे मशरूम हार्ट फार्म संतापूर (केरळ) येथे एकत्र काम करत होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांनी मिळून लिजीचा पती रिजोशचा ३१ आॅक्टोबर २०१९ रोजी खून केला आहे. दोघांवर संतापूर पोलीसांत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे ते तेथून पळून मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी पनवेल गाठले. वाशीम याच्या भावाला संतापूर पोलिसांनी अटक केल्याचे समजल्याने लिजी व वाशीम यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघांवरही मुंबईतल्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू असून शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: A suicide attempt at a lover, a lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.