Video: वाशी खाडी पुलावर अचानक टोयटा इनोव्हा कारला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 23:20 IST2021-10-15T23:19:47+5:302021-10-15T23:20:53+5:30
महामार्गावर मुंबईकडे जाणा-या मार्गीकेवर ही घटना घडली. कारने अचानक पेट घेतल्याने आतमधील प्रवासी तत्काळ कारबाहेर पडले.

Video: वाशी खाडी पुलावर अचानक टोयटा इनोव्हा कारला आग
नवी मुंबई: सायन पनवेल महामार्गावर वाशी खाडीपुलावर सायंकाळी सात वाजता इनोव्हा कारला आग लागली. आगीमध्ये कार जळून खाक झाली.
महामार्गावर मुंबईकडे जाणा-या मार्गीकेवर ही घटना घडली. कारने अचानक पेट घेतल्याने आतमधील प्रवासी तत्काळ कारबाहेर पडले. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. आगीमध्ये कारचे पूर्ण नुकसान झाले आहे. अपघातामुळे मुंबईकडे जाणा-या मार्गीकेवरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
नवी मुंबई : वाशी खाडी पुलावर अचानक टोयटा इनोव्हा कारला आग लागली. pic.twitter.com/XE9r2y9jO9
— Lokmat (@MiLOKMAT) October 15, 2021