गणित चुकल्याने विद्यार्थिनीला मारहाण; घणसोलीतली घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 10, 2023 15:25 IST2023-12-10T15:24:54+5:302023-12-10T15:25:05+5:30

पालकांच्या तक्रारीवरून शिक्षिकेवर गुन्हा दाखल 

Student beaten up for failing maths; Incident in Ghansoli | गणित चुकल्याने विद्यार्थिनीला मारहाण; घणसोलीतली घटना

गणित चुकल्याने विद्यार्थिनीला मारहाण; घणसोलीतली घटना

नवी मुंबई : गृहपाठाला दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने विद्यार्थिनीला बांबूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घणसोली येथील खासगी शिकवणीत हा प्रकार घडला आहे. 

घणसोली गाव येथे राहणाऱ्या समृद्धी जगताप (१४) या विद्यार्थिनी सोबत हा प्रकार घडला आहे. ती नववीत शिकत असून घणसोली सेक्टर ५ येथील सना या खासगी शिकवणीला जाते. क्लासच्या शिक्षिका शकीला अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला होता. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा गृहपाठ पूर्ण झाला नव्हता तर काहींची उत्तरे चुकली होती.

समृद्धी हिचे देखील गणिताचे उत्तर चुकले होते. यावरून शकीला यांनी बांबू व लाकडी फळीने समृद्धीला बेदम मारहाण केली. यामध्ये तिचा अंगावर ठिकठिकाणी सूज आली असता घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार पालकांना सांगितलं. त्यावरून शनिवारी संध्याकाळी त्यांनी कोपर खैरणे पोलिसांकडे तक्रार केली असता शिक्षिका शकीला अन्सारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Student beaten up for failing maths; Incident in Ghansoli