शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

समूहसंघटकांचा न्यायासाठी संघर्ष

By admin | Updated: July 3, 2017 06:50 IST

महापालिकेत गेल्या दहा वर्षांपासून समूहसंघटक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परवड सुरू आहे. नियमानुसार भरती होऊनही

कमलाकर कांबळे/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेत गेल्या दहा वर्षांपासून समूहसंघटक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परवड सुरू आहे. नियमानुसार भरती होऊनही अगदी नाममात्र मानधनावर त्यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांप्रमाणे आम्हालाही सेवेत कायम करून त्यानुसार वेतनश्रेणी लागू करावी, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे; परंतु प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याचे दिसून आले आहे. सध्या महापालिकेच्या समाज विकास विभागात एकूण २१ समूहसंघटक कार्यरत आहेत. ६ जुलै २00६ रोजी रीतसर जाहिरात काढून लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे त्यांची भरती करण्यात आली आहे. एकूणच त्यांची भरती सरळ सेवेने झालेली असतानाही त्यांना कायम सेवेत समावून घेण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांचा मागील दहा वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून महिला व बालकल्याण, मागासवर्गीय घटक, स्थानिक प्रकल्पग्रस्त, तसेच कंत्राटी सफाई कामगार, दगडखाण बांधकाम मजूर, खुला प्रवर्ग, विद्यार्थी, युवक, कल्याण घटकांसाठी राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा प्रचार करण्यात या समूहसंघटकांचा मोलाचा सहभाग असतो. महापालिका कार्यक्षेत्रातील महिला बचतगट, स्वंयसेवी संस्था, शाळा, महाविद्यालयांपर्यंत समूहसंघटकांच्या माध्यमातून या योजना पोहोचविल्या जातात. राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांना मूर्त स्वरूप देण्याचे महत्त्वपूर्ण काम या समूहसंघटकांकडून केले जाते. हाच घटक मागील दहा वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष करीत आहे. सेवेत कायम करून त्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू आहे. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांची वये झाली आहेत. त्यामुळे त्यांना अन्य अस्थापनांवर नोकरी मिळण्याचेही मार्गही बंद झाले आहेत. नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूर महापालिकांनी विशेष ठराव पास करून आपल्याकडे कार्यरत असलेल्या समूहसंघटकांना सेवेत कायम केले आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिकेनेही ठराव पारित करून आम्हालाही सेवेत कायम करावे, अशी या समूहसंघटकांची मागणी आहे.महापौरांच्या आदेशाला केराची टोपली२७ फेब्रुवारी २0१५ रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन महापौर सागर नाईक यांनी समूहसंघटकांना सेवेत कायम करण्याबाबतच ठराव तयार करून सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आदेश प्रशासन विभागाला दिले होते. २६ जानेवारी २0१६ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील व अनंत सुतार यांनी समूहसंघटकांचा प्रस्ताव न आल्याने प्रशासनाला धारेवर धरले. समूहसंघटकांच्या प्रस्तावासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली असून, समितीच्या बैठकीचे इतिवृत्त पुढील सर्वसाधारण सभेत सादर केले जाईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले; परंतु यासंदर्भात आजतागायत कोणतीही कार्यवाही झाली नाही.तुटपुंजे मानधनसमूहसंघटकांना मिळणारे मानधनही अगदी तुटपुंजे आहे. त्यांना केवळ महिना ११,000 रुपये इतके मानधन दिले जाते. सध्याच्या महागाईच्या काळात हे मानधन अपुरे आहे. विशेष म्हणजे, सफाई कामगारांना समूहसंघटकांपेक्षा अधिक वेतन दिले जाते; परंतु राज्य सरकार आणि महापालिकेच्या विविध योजनांचा प्रचार करणाऱ्या समूहसंघटकांना नाममात्र मानधनावर काम करावे लागते.