शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेले ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने वर्षभरात हस्तगत, ३५ लाखांचे दागिने परत; ३१ कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 03:29 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यस्त असतानाही, वर्षभरात पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ३१ जणांना ३५ लाखांचे दागिने परत दिले असून, उर्वरितांना दागिने परत देणार आहेत.

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यस्त असतानाही, वर्षभरात पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ३१ जणांना ३५ लाखांचे दागिने परत दिले असून, उर्वरितांना दागिने परत देणार आहेत. परिमंडळ एक अंतर्गत फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी वाशीमधील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. आयुक्त बिपीनकुमार सिंग, उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनायक वस्त, भरत गाडे व सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीसही व्यस्त होते. ८० टक्के पोलीस दलच कार्यरत होते. मनुष्यबळ कमी असताना व बंदोबस्ताचा ताण असतानाही पोलिसांनी चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यांमधील ३ कोटी ७५ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.जप्त केलेले दागिने परत करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारी त्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे गर्दी होऊ नये, यासाठी ३१ नागरिकांना बोलावून त्यांना त्यांचे ३५ लाख रुपयांचे दागिने परत केले आहेत. उर्वरित नागरिकांनाही कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने त्यांचे दागिने परत केले जाणार आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईGoldसोनं