शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य - केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 06:10 IST

प्राधान्यपर गटांसाठी राज्यांना दोन कोटी डोस देण्यात येणार असून, सशुल्क श्रेणीत आणखी दोन कोटी डोस दिले जातील. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे मोफत किंवा शुल्क आकारून लसीकरणासाठी हे डोस असतील. केंद्राकडून राज्यांना लोकसंख्येनुसार पुरवठा होतो. राज्यांच्या थेट खरेदीशी संबंधित हा पुरवठा आहे.

हरिष गुप्ता - नवी दिल्ली : राज्यांकडून कोविड प्रतिबंधक लशीचा पुरवठा करण्याची जोरदार मागणी होत असताना केंद्राने स्पष्ट केले की, मे महिन्यासाठी केंद्राकडे ८.५ कोटी डोस असून त्यापैकी १ ते ११ मेपर्यंत १.८ कोटी डोसेज देण्यात आले आहेत. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यासाठी राज्यांना लसीचे दोन कोटी डोस मिळतील. केंद्र सरकारने राज्य आणि सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, उर्वरित डोसही लसीकरण धोरणानुसार राज्यांना वाटप केले जातील. लसीकरणासाठी दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना ७० ते ३० या गुणोत्तराप्रमाणे प्राधान्य देण्यात यावे.प्राधान्यपर गटांसाठी राज्यांना दोन कोटी डोस देण्यात येणार असून, सशुल्क श्रेणीत आणखी दोन कोटी डोस दिले जातील. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे मोफत किंवा शुल्क आकारून लसीकरणासाठी हे डोस असतील. केंद्राकडून राज्यांना लोकसंख्येनुसार पुरवठा होतो. राज्यांच्या थेट खरेदीशी संबंधित हा पुरवठा आहे. लस उत्पादकांकडून केंद्राकडून खरेदी केलेल्या डोसचे वाटप कसे करावे, यासाठी स्वतंत्र सूत्र आहे.  केंद्राने रशियाच्या स्पुतनिक-व्ही या लसीबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. कारण मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यांपासून थेट खुल्या बाजारात लस विकणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सूचना केली नव्हतीनवी दिल्ली : १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण थांबविण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी अशी सूचना केली नव्हती, असे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने स्पष्ट केले.  ४५ वर्षांवरील लोकांना कोविड प्रतिबंध लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे, असे केंद्र सरकारने सांगितले होते; परंतु, १८ ते ४४ वर्षे लोकांसाठी लस वळविण्यासंबंधी सूचना आरोग्य मंत्र्यांनी केली नव्हती, असे केंद्राने म्हटले आहे

... म्हणून भारतातील कोरोनाचे संकट गंभीरवॉशिंग्टन : कोरोनाच्या संकटाचे आकलन करण्यात भारत कमी पडला. हे संकट आता संपले आहे, असा विचार करून भारताने लॉकडाऊन वेळेआधीच उठवून सारे काही सुरु केल्याने आज तो देश गंभीर संकटात सापडला आहे. अनेक राज्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, औषधे - ऑक्सिजनचा तुटवडा, बेड्सची कमतरता आदी समस्यांचा सामना करीत आहेत, असे मत अमेरिकेचे आघाडीचे साथरोगतज्ज्ञ आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी तेथील खासदारांसमोर मांडले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदी