भाजीपाल्यासह धान्य मार्केट सुरू; थेट मुंबईत कृषीमाल पाठविण्यास प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 00:17 IST2020-05-19T00:17:16+5:302020-05-19T00:17:43+5:30
नवी मुंबई : सात दिवसांच्या बंदनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तीन मार्केट पुन्हा सुरू झाली आहेत. यामुळे मुंबई ...

भाजीपाल्यासह धान्य मार्केट सुरू; थेट मुंबईत कृषीमाल पाठविण्यास प्राधान्य
नवी मुंबई : सात दिवसांच्या बंदनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तीन मार्केट पुन्हा सुरू झाली आहेत. यामुळे मुंबई व नवी मुंबईमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.
एक आठवड्यानंतर एपीएमसी सुरू होणार असल्याने खरेदीसाठी गर्दी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करूनच आत सोडण्यात येत होते. भाजीपाला मार्केटमध्ये ९३ वाहनांची आवक झाली. ३२९ टेम्पोंमधून भाजीपाला थेट मुंबईत पाठविण्यात आला. फोनवरूनच आॅर्डर घेण्यास प्राधान्य दिले होते.
मसाला मार्केटमध्ये १७७ वाहनांची आवक झाली. धान्य मार्केटमध्ये सोमवारी आवक बंद ठेवली होती. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या मालाची विक्री करण्यात आली. सायंकाळपर्यंत २०८ वाहनांमधून अन्नधान्य मुंबईत पाठविण्यात आले.
फळ व कांदा मार्केट
गुरुवारपासून सुरू
एपीएमसीमधील फळ व कांदा मार्केट गुरुवारपासून सुरू होणार आहे. कांदा व
बटाट्याचे ७५ टेम्पो थेट मुंबईत पाठविण्यात आले आहेत. दिवसभर मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती व्यापारी व बाजार समिती प्रशासनाने दिली.