जुगारासाठी पैसे नाकारल्याने केले वार, कोपर खैरणेतली घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 13, 2022 15:49 IST2022-09-13T15:48:06+5:302022-09-13T15:49:08+5:30

जुगार खेळण्यासाठी पैशाची मागणी करूनही पैसे न दिल्याने वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Stabbed for refusing money for gambling incident in Kopar Khairne | जुगारासाठी पैसे नाकारल्याने केले वार, कोपर खैरणेतली घटना

जुगारासाठी पैसे नाकारल्याने केले वार, कोपर खैरणेतली घटना

नवी मुंबई :

जुगार खेळण्यासाठी पैशाची मागणी करूनही पैसे न दिल्याने वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोपर खैरणे सेक्टर १९ येथे रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी आकाश गोपाळे हा तरुण उभा होता. यावेळी त्याच्या परिचयाचा धीरज मोहन पाटील हा त्याठिकाणी आला. त्याने आकाश याच्याकडे जुगार खेळण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली. परंतु आकाश याने पैसे देण्यास नकार दिल्याचा त्याला राग आला. यामुळे त्याने शिवीगाळ करत साथीदाराला हत्यार घेऊन येण्याचा इशारा दिला. यानंतर काहीच वेळात त्याचा साथीदार त्याठिकाणी आला असता त्याच्याकडील धारदार शस्त्राने धीरज याच्यावर वार करून पळ काढला. यामध्ये तो जखमी झाला असता मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सोमवारी धीरज व त्याच्या साथीदारावर कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Stabbed for refusing money for gambling incident in Kopar Khairne