कर्नाळा खिंडीत एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात; 1 मृत्यू 15 जण जखमी
By वैभव गायकर | Updated: April 25, 2023 17:34 IST2023-04-25T17:32:02+5:302023-04-25T17:34:48+5:30
दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात झाला.

कर्नाळा खिंडीत एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात; 1 मृत्यू 15 जण जखमी
वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खंडित पनवेल ते महाड ला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला मंगळावर दि.25 रोजी झालेल्या अपघातात एक प्रवासी मृत्यू पावला आहे.15 जण या अपघातात जखमी झाले आहेत.
दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात झाला.नागमोडी वळणे असलेल्या या मार्गावर वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.या घटनेतील जखमींना उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.6 जखमी प्रवासी याठिकाणी उपचार घेत आहेत.एका पुरुष प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाल्याच्या वृत्ताला उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मधुकर पांचाळ यांनी दुजोरा दिला आहे.अपघातात जवळपास 15 प्रवाशांना दुखापत झाली आहे.काहींवर प्रथमोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.मृत प्रवाशाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.मृत प्रवासी 30 ते 35 वयोगटातील आहे.घटनास्थळी पनवेल शहर वाहतूक चे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.या अपघातानंतर मार्गावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"